Home क्रीडा हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडावं, अंबाती रायडू असं का म्हणाला?

हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडावं, अंबाती रायडू असं का म्हणाला?

0
हार्दिक पांड्याने कर्णधारपद सोडावं, अंबाती रायडू असं का म्हणाला?
आयपीएल 2027 स्पर्धेसाठी फ्रेंचायझी आता जोरदार तयारी करत आहे. मिनी लिलावापूर्वी खेळाडूंची ट्रेड करण्यासाठी फ्रेंचायझींची धडपड सुरू आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील खेळाडूंच्या अदलाबदलीची चर्चा तीव्र झाली आहे. पंजाब किंग्स हार्दिक पांड्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं जात आहे. (Photo: ANI)
हार्दिक पांड्या आणि भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांच्यासाठी मुंबई आणि पंजाब किंग्स यांच्यातील चर्चा बऱ्यापैकी पुढे सरकली आहे. श्रेयस अय्यर पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणून कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रेड झाली तर हार्दिक तिथे एक खेळाडू म्हणून जाईल. (Photo: ANI)
भारताचा माजी फलंदाज अंबाती रायडूच्या मते, हार्दिक पांड्याने आयपीएलचे कर्णधारपद सोडावे. त्याने फक्त आपल्या खेळाचा आनंद घ्यावा आणि नेतृत्वाच्या दबावापासून दूर राहून आपल्या खेळावर आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असं मत रायडूने व्यक्त केलं आहे. (Photo: ANI)
अंबाती रायडू म्हणाला की, “जर मी हार्दिकच्या जागी असतो, तर मला अशा संघात जायला आवडले असते जिथे मी माझ्या खेळाचा आनंद घेऊ शकेन, जिथे माझी मानसिकता चांगली असेल आणि लगेचच जास्त दबाव येणार नाही.” (Photo: ANI)
अंबाती रायडूच्या मते, जर हार्दिक मुंबई इंडियन्ससोबत राहिला, तर त्याने संघाचे कर्णधारपद स्वीकारू नये. आयपीएल 2024 च्या आधी हार्दिक गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्समध्ये परतला आणि रोहित शर्माच्या जागी त्याला लगेचच कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. पण त्यानंतर त्याला हे पद भूषवणं कठीण गेलं.(Photo: ANI)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here