लक्ष्मीपूजनाच्या ताटात कोणत्या वस्तू असाव्यात?

पूजेमध्ये हळद-कुंकवाला विशेष महत्त्व असून ते शुभतेचे प्रतीक मानले जाते.

तांदळाच्या अक्षता पूजेसाठी वापरल्या जातात. त्या समृद्धी आणि मंगलकार्याचे प्रतीक मानल्या जातात.

पूजेमध्ये सुपारी आणि पान ठेवण्याची परंपरा आहे.

धन आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून ताटात नाणी व नोटा ठेवल्या जातात.

देवी लक्ष्मीला फुले अर्पण करण्यासाठी ताटात ताजी फुले ठेवावीत.

पूजेच्या वेळी दिवा लावण्यासाठी ताटात दिवा आणि वाती ठेवाव्यात.

देवतेला हळद आणि चंदनाचा गंध अर्पण करण्यासाठी यांचा वापर केला जातो.

नैवेद्यासाठी फळे, पेढे किंवा इतर गोड पदार्थ ठेवले जातात.

पूजेच्या वेळी सुगंध आणि प्रसन्न वातावरणासाठी धूप-अगरबत्ती वापरली जाते.

 लक्ष्मीपूजनाच्या शेवटी आरती करण्यासाठी कापूर ठेवला जातो.