भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ आणि लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा स्टार फलंदाज विराट कोहली आज आपला 38 वा वाढदिवस अत्यंत दिमाखात साजरा करत आहे. वयाच्या 38 व्या वर्षीही विराटची जिद्द, फिटनेस आणि धावांची भूक पाहून संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. सध्या भारतीय संघासोबत ऑकलंड दौऱ्यावर असलेल्या विराटने आपल्या वाढदिवसाच्या बरोबर एक दिवस आधी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात 74 धावांची शानदार खेळी करून चाहत्यांना एक प्रकारे गिफ्टच दिले आहे. त्याच्या या धडाकेबाज खेळीने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.
2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या कोहलीने आपल्या अफाट खेळीने आणि जबरदस्त फिटनेसने क्रीडा जगतात एक सुवर्ण इतिहास रचला आहे. त्याच्या या खास दिवशी बीसीसीआयसह जगातील दिग्गजांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे.
5️⃣6️⃣6️⃣ Intl. Matches & Counting 🫡
2️⃣8️⃣6️⃣0️⃣1️⃣ Intl. Runs & Counting 👏
8️⃣6️⃣ Intl. Centuries & Counting 👑Winner of ICC Men’s ODI World Cup 2011, ICC Champions Trophy 2013 & 2025, and ICC Men’s T20 World Cup 2024 🏆
Happy Birthday to one of the finest to ever grace the game, Virat Kohli 🎂🥳
#TeamIndia | @imVkohli
— BCCI (@BCCI) November 5, 2026
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (‘BCCI’) ‘एक्स’ (ट्विटर) वर पोस्ट करत लिहिले, “566 आंतरराष्ट्रीय सामने, 28,601 धावा आणि 86 शतके… अजूनही प्रवास सुरूच आहे! आयसीसी विश्वचषक 2011, चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 व 2025 आणि टी-20 विश्वचषक 2024 चा विजेता असलेल्या विराटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
🇮🇳’s No. 1️⃣8️⃣: A generational talent, an inspiration to billions of cricket fans and THE undisputed emperor of modern-day cricket. 👑🐐
#PlayBold #ನಮ್ಮRCB #HappyBirthdayKingKohli | Virat Kohli https://t.co/pewa6x9QhI
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 5, 2026
माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैनाने कौतुक करताना म्हटले, “शानदार कव्हर ड्राईव्हपासून ते रेकॉर्डब्रेक धावांच्या पाठलागापर्यंत, तू चाहत्यांना अप्रतिम आठवणी दिल्या आहेत. एकदा किंग, कायम किंग!” याशिवाय, शिखर धवन, दिनेश कार्तिक आणि त्याची आयपीएल फ्रँचायझी ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू’ (RCB) यांनीही खास शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.prahaar.in/2026/11/04/womens-premier-league-2027-schedule-announced-tournament-to-be-held-between-january-14-and-february-7/
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द विक्रमांच्या पानांनी भरलेली आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 123 सामन्यांत 9,230 धावा, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 318 सामन्यांत विक्रमी 55 शतकांसह तब्बल 15,183 धावा आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 4,188 धावा चोपल्या आहेत. तिन्ही फॉरमॅट मिळून 566 सामन्यांत 28,601 धावा करणारा विराट हा जागतिक क्रिकेटमधील एक अजेय योद्धा ठरला आहे. फिटनेस असो वा कठीण प्रसंगी सामना जिंकून देण्याची जिद्द, कोहलीने प्रत्येक वेळी सिद्ध केले आहे की तो का युगाचा महानायक आहे.