Home ब्रेकिंग न्यूज मुंबईकरांनो सावधान! दिवाळीत घाम फुटणार की हुडहुडी भरणार? हवामानाचा हा भयानक अंदाज वाचून थक्क व्हाल!

मुंबईकरांनो सावधान! दिवाळीत घाम फुटणार की हुडहुडी भरणार? हवामानाचा हा भयानक अंदाज वाचून थक्क व्हाल!

0
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीत घाम फुटणार की हुडहुडी भरणार? हवामानाचा हा भयानक अंदाज वाचून थक्क व्हाल!
दिवाळीच्या कालावधीत मुंबईसाठी हवामान अंदाज (Photo: ANI)

मुंबईत यंदाची दिवाळी गरम हवामान आणि खालावलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या सावटाखाली साजरी करावी लागणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी सुखद वारे वाहत असले, तरी दिवसा वाढणारा उकाडा मुंबईकरांच्या नसानसात घाम आणत आहे. हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अहवालानुसार, पुढील पाच ते सहा दिवस मुंबईचे कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची दाट शक्यता आहे.

दिवाळीत उकाड्याचा तडाखा

दिवाळीचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना यंदा घामाच्या धारा सहन कराव्या लागतील. मागील काही दिवसांत तापमानात किंचित घट झाली असली, तरी तो दिलासा अल्पजीवी ठरू लागला आहे. सध्या किमान तापमान 28 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, दिवसाचा पारा 36 अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिरावला आहे. हवामान विभागाचे संचालक बिक्रम सिंग यांनी स्पष्ट केले आहे की, मुंबईत खऱ्या अर्थाने गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी आणि तापमानत मोठी घट होण्यासाठी डिसेंबर महिन्याची वाट पाहावी लागेल.

https://www.prahaar.in/2026/11/05/overwhelming-response-to-the-exhibition-by-womens-self-help-groups-organized-for-diwali-at-the-municipal-corporation-headquarters/

प्रदूषणाचा विळखा कायम

केवळ उष्णताच नाही, तर हवेची गुणवत्ता देखील मुंबईकरांसाठी चिंतेची ठरत आहे. नुकत्याच झालेल्या पावसानंतरही शहरातील हवेचा दर्जा खालावलेलाच आहे. गुरुवारी सकाळी मुंबईचा एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 154 नोंदवला गेला. हा आकडा ‘वाईट’ (Poor) श्रेणीत मोडतो. AQI.in च्या वर्गीकरणानुसार, 0 ते 50 हा दर्जा ‘उत्तम’, 51 ते 100 ‘समाधानकारक’, 101 ते 200 ‘वाईट’, 201 ते 300 ‘अतिवाईट’ आणि 300 च्या वर असलेला निर्देशांक ‘गंभीर’ मानला जातो. प्रदूषणाची ही पातळी नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

आरोग्यावर आणि सणांवर परिणाम

उकाडा आणि हवेतील प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत दिवाळीत फटाक्यांमुळे हवेचा दर्जा आणखी ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. एकीकडे सणाचा उत्साह असला, तरी हवामानाचा हा लहरीपणा मुंबईकरांची डोकेदुखी वाढवत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here