Home ब्रेकिंग न्यूज कोअर कमिटीला विचारल्याशिवाय राष्ट्रवादीत यापुढे कोणताही निर्णय नाही! – पार्थ पवारांचा वरिष्ठ नेत्यांना शब्द

कोअर कमिटीला विचारल्याशिवाय राष्ट्रवादीत यापुढे कोणताही निर्णय नाही! – पार्थ पवारांचा वरिष्ठ नेत्यांना शब्द

0
कोअर कमिटीला विचारल्याशिवाय राष्ट्रवादीत यापुढे कोणताही निर्णय नाही! – पार्थ पवारांचा वरिष्ठ नेत्यांना शब्द
पार्थ पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांनी यापुढे महत्त्वाचे निर्णय घेताना कोअर कमिटीला विश्वासात घेण्याची ग्वाही दिल्याचे समजते. अलीकडेच पक्षातील काही नियुक्त्या वरिष्ठ नेत्यांना विश्वासात न घेता करण्यात आल्याने नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत वादावर पूर्णपणे तोडगा निघाला नसला, तरी यापुढे सामूहिक विचारविनिमयातून निर्णय घेण्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी मुंबईत झाली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, समीर भुजबळ आणि धनंजय मुंडे या बैठकीला उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपासून पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत मतभेदांमुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. विशेषतः पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील काही वरिष्ठ नेते नाराज असल्याची चर्चा होती.

पार्थ पवार यांच्या आदेशाने अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दीकी आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्त्या करताना कोअर कमिटीला विश्वासात घेतले नसल्याने वरिष्ठ नेत्यांच्या गटात नाराजी होती. त्यामुळे या नियुक्त्यांचा फेरविचार होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बुधवारी झालेल्या बैठकीत या नियुक्त्या कायम ठेवण्याचे स्पष्ट झाले. झिशान सिद्दीकी मुंबई अध्यक्ष, तर उमेश पाटील मुख्य प्रवक्ते म्हणून पुढील सहा महिने काम पाहतील. या कालावधीत त्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका पार्थ पवार यांनी मांडल्याचे समजते.

https://www.prahaar.in/2026/11/04/12-major-decisions-by-the-cabinet-significant-relief-for-students-vehicle-owners-and-farmers/

अंतर्गत वाद शमला का?

बैठकीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत वादावर सार्वजनिक भाष्य करणे टाळले. मात्र, यापुढे कोअर कमिटीशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील, असा शब्द पार्थ पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे नियुक्त्यांवरून निर्माण झालेली नाराजी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांचे प्रदेशाध्यक्षपद आणि प्रफुल्ल पटेल यांचे राष्ट्रीय कार्याध्यक्षपद याबाबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे पक्षातील अंतर्गत मतभेदांवर पूर्णविराम लागलेला नसल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here