Home ताज्या घडामोडी केंद्राकडून मच्छिमारांसाठी ‘एनडीआरएफ’च्या मदतीत वाढ

केंद्राकडून मच्छिमारांसाठी ‘एनडीआरएफ’च्या मदतीत वाढ

0
केंद्राकडून मच्छिमारांसाठी ‘एनडीआरएफ’च्या मदतीत वाढ
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे (Photo: @NiteshNRane X)

मुंबई: नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या मच्छिमारांना केंद्र सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एनडीआरएफ) माध्यमातून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी आता प्रति बोट आठ हजार रुपये, तर जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी प्रति जाळे चार हजार रुपये मिळणार आहेत. पूर्ण नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी 19 हजार रुपये आणि मासेमारी जाळ्यांसाठी 5 हजार 100 रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच मत्स्यबीज फार्मसाठी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 13 हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिली.

 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राणे म्हणाले, “केंद्र सरकारने एनडीआरएफच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे मच्छिमारांकडून या मदतीत वाढ करण्याची मागणी होत होती. एनडीआरएफअंतर्गत दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत दिली जात होती; मात्र मत्स्यव्यवसाय आणि मच्छिमारांसाठी असलेली ही मदत पूर्वी तुटपुंजी होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने त्यामध्ये मोठे बदल केले आहेत. त्यानुसार अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या दुरुस्तीसाठी प्रति बोट आठ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. अंशतः नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी मदतीची तरतूद नव्हती; आता प्रति जाळे चार हजार रुपये मिळतील. पूर्ण नुकसान झालेल्या मासेमारी बोटींच्या पुनर्स्थापनेसाठी प्रति बोट 19 हजार रुपये, तर पूर्ण नुकसान झालेल्या मासेमारी जाळ्यांसाठी प्रति जाळे 5 हजार 100 रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय मत्स्यबीज फार्मसाठी लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १३ हजार रुपयांचे इनपुट अनुदान मिळणार आहे. एनडीआरएफअंतर्गत यापूर्वी मिळणारी मदत कमी होती. आता केंद्र सरकारने मच्छिमारांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान असो किंवा दुष्काळी परिस्थिती, मच्छिमारांना या निर्णयामुळे आर्थिक आधार मिळणार आहे.”

https://www.prahaar.in/2026/11/04/ahilyanagar-district-bank-election-vikhe-thorat-panel-victory-nilesh-lanke/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here