भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेची सुरूवात विजयाने झाली आहे. पहिल्याच वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात भारताने न्यूझीलंडला 185 धावांवर रोखलं. पण पावसाच्या व्यत्ययामुळे षटकं आणि धावा कमी करण्यात आला. भारतापुढे 32 षटकात 143 धावा गाठण्याचं आव्हान होतं. भारताने 22.4 षटकात 5 गडी गमवून विजयासाठी दिलेलं आव्हान गाठलं. या विजयात गोलंदाज अर्शदीप सिंह, अंशुल कंबोज आणि फलंदाज विराट कोहलीचं योगदान महत्त्वाचं ठरलं. रोहित शर्मा या सामन्यात खातंही खोलू शकला नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला. पण सामन्यानंतर कर्णधार शुभमन गिलने विजयाचा श्रेय देताना रोहित शर्माचं नाव घेतलं.तसेच सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरल्याचं सांगितलं.
रोहित शर्माबाबत शुभमन गिल काय म्हणाला?
कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, ‘मला वाटतं आमची गोलंदाजी खूप चांगली झाली. मला वाटतं आमचं क्षेत्ररक्षणही खूप चांगलं होतं. रोहित शर्माच्या त्या रनआऊटमुळे, मला वाटतं, सामन्याची गतीच बदलली. मला वाटतं मिचेल आणि फिलिप्स भागीदारी खूप महत्त्वाची होती, जी आपण भारतातही पाहिली होती. त्या दोघांनी भारतात खूप चांगली फलंदाजी केली होती. एकंदरीत, मला वाटतं आमच्या संघाची कामगिरी खूप चांगली झाली.’
अंशुल कंबोज आणि गुरनूर ब्रार यांच्या कामगिरीबद्दल कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, ‘अंशुल हा अशा प्रकारचा गोलंदाज आहे, जो मला वाटतं अशा प्रकारच्या खेळपट्टीसाठीच बनवला गेला आहे. नेहमी धारदार गोलंदाजी करतो, चेंडू सीम करण्याचा प्रयत्न करतो. इतकंच काय तर जुन्या चेंडूने तो चांगला गोलंदाजी करतो. दुसरीकडे, जेव्हा खेळपट्टीवर जास्त काही घडत नसतं, तेव्हा ब्रार अतिरिक्त उसळी निर्माण करू शकतो. ज्या प्रकारे त्या दोघांनी गोलंदाजी केली, ती पाहणे खरोखरच अप्रतिम होते.’
https://www.prahaar.in/2026/11/04/fans-react-to-virat-kohli-s-bow-and-arrow-celebration-after-superman-catch-asking-if-ramayana-promotion-is-underway/
पावसामुळे खेळ थांबला असताना परिस्थितीशी जुळवून घेण्याबद्दल कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, ‘जेव्हा तुम्ही स्थिरावलेले असता आणि मग पाऊस येतो, तेव्हा ते कधीच सोपे नसते. पावसानंतर खेळपट्टी थोडी वेगवान झाली. म्हणून आम्ही फक्त आमचा नेहमीचा क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटते की, ज्या प्रकारे विराट भाई फलंदाजीला आला, त्यामुळे आमच्यासाठी गोष्टी खूप सोप्या झाल्या.
वेलिंग्टन सामन्यापूर्वी सुधारणा करण्याच्या क्षेत्रांबद्दल कर्णधार शुभमन गिल म्हणाला की, ‘खरं तर काहीच नाही, जर आम्ही आमच्या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकलो, तर आमच्यासाठी सातत्य महत्त्वाचे आहे. जर आम्ही तीच गोष्ट वारंवार करू शकलो, तर मला वाटते की आम्ही एका चांगल्या स्थितीत असू.’