Home महाराष्ट्र नाशिक Nashik : भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘या’ सहा जणांना संधी

Nashik : भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘या’ सहा जणांना संधी

0
Nashik : भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘या’ सहा जणांना संधी

Nashik : नाशिक महानगरपालिकेतील (Nashik Municipal Corporation) १० स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया आज (बुधवार ४ नोव्हेंबर) रोजी पार पडत आहे. शिवसेनपाठोपाठ आता भाजपने (BJP) आपल्या स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत.

स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘या’ सहा जणांना संधी

भाजपच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या यादीत भाजप प्रवक्ते अजित चव्हाण, नामकोचे माजी चेअरमन तथा व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, संदीप लेनकर, महिला पदाधिकारी रोहिणी नायडू, रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांचा समावेश आहे. या सहाही जणांना स्वीकृतसाठी एक वर्षांचा कालावधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे.

शिवसेनेकडून कोणाला संधी ?

तर दुसरीकडे शिवसेनेकडून बाबुराव आढाव आणि राजू लवटे यांची नावे स्वीकृतसाठी अंतिम आहेत, अशी माहिती पक्षाचे महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी दिली आहे. या दोघांना स्वीकृतसाठी एक वर्षांचा कालावधी मिळणार असून, शिवसेना शिंदे गटाकडे २ जागांसाठी तब्बल ७४ इच्छुक होते. त्यामधून या दोघांची नावे अंतिम झाली आहेत.

नाशिक महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या १० जागांपैकी भाजपच्या वाट्याला ६, शिंदे सेनेला २ आणि ठाकरे सेना-काँग्रेस आघाडीला २ जागा मिळाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here