Home फोटो गॅलरी Diwali Gifts Ideas : दिवाळीत द्या आरोग्यदायी भेटवस्तू! मिठाईऐवजी निवडा हे 5 खास पर्याय

Diwali Gifts Ideas : दिवाळीत द्या आरोग्यदायी भेटवस्तू! मिठाईऐवजी निवडा हे 5 खास पर्याय

0
Diwali Gifts Ideas : दिवाळीत द्या आरोग्यदायी भेटवस्तू! मिठाईऐवजी निवडा हे 5 खास पर्याय
दिवाळीत द्या आरोग्यदायी भेटवस्तू! मिठाईऐवजी निवडा हे 5 खास पर्याय (Photo Pintrest)

मिठाईऐवजी सुकामेवा आणि पौष्टिक पदार्थांचा हॅम्पर दिवाळीत मिठाईचा डबा देण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा त्याऐवजी बदाम, अक्रोड, पिस्ते, भाजलेले मखाणे, शेंगदाणे आणि विविध बियांचा समावेश असलेला आकर्षक हॅम्पर तयार करू शकता. याशिवाय अंजीर बर्फी, खजूर-सुकामेवा बर्फी आणि तिळाचे लाडू असे पारंपरिक पदार्थही भेट देऊ शकता. मात्र, गूळ, मध किंवा खजूर वापरून तयार केलेले पदार्थ पूर्णपणे साखरमुक्त किंवा कमी कॅलरीचे असतात, असे समजू नये. या पदार्थांमध्येही कॅलरी असतात. त्यामुळे पौष्टिक पदार्थांची निवड करताना त्यांच्या सेवनाचे प्रमाणही लक्षात घेणे गरजेचे आहे.

स्नॅक हॅम्पर दिवाळीच्या भेटवस्तूंमध्ये चिवडा, शेव, बिस्किटे आणि इतर तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो. त्याऐवजी भाजलेले चणे, मसाला मखाणे, भाजलेले शेंगदाणे, मिश्र बिया आणि बेक केलेले पदार्थ यांचा हॅम्पर तयार करा. यामध्ये कमी साखर आणि कमी मीठ असलेले प्रोटीन बारही ठेवता येतील. आकर्षक डबे किंवा पुन्हा वापरता येणारे स्नॅक बॉक्स वापरल्यास भेटवस्तू अधिक सुंदर दिसेल. विशेष म्हणजे, हे डबे नंतरही वापरता येतील.
 शीतपेयांऐवजी भारतीय पेयांचे पर्याय दिवाळीच्या काळात गोड पेये आणि पॅकबंद ज्यूस देण्याऐवजी नारळपाणी, साधे ताक, बिनसाखरेची लस्सी किंवा हर्बल टी असे पर्याय निवडू शकता. हे पेय भेटवस्तूंच्या टोपलीत आकर्षक पद्धतीने सजवून देता येतील. पॅकबंद पेये खरेदी करताना त्यातील साखरेचे प्रमाण, घटकांची माहिती आणि साठवणुकीच्या सूचना तपासणे महत्त्वाचे आहे. शक्यतो अतिरिक्त साखर नसलेले पर्याय निवडावेत.
ताज्या फळांची रंगीबेरंगी टोपली फळांची टोपली ही आरोग्यदायी आणि आकर्षक भेट ठरू शकते. सफरचंद, संत्री, पेरू, डाळिंब आणि उपलब्ध मोसमी फळांचा त्यात समावेश करता येईल. यासोबत थोडा सुकामेवा आणि बिया ठेवल्यास ही भेट अधिक खास बनेल. फळांचा रस पिण्यापेक्षा अख्खी फळे खाणे अधिक फायदेशीर ठरते. कारण अख्ख्या फळांमधून शरीराला फायबर मिळते. त्यामुळे दिवाळीत फळांची टोपली देणे हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
फिटनेस आणि वेलनेसशी संबंधित भेटवस्तू भेटवस्तू म्हणजे नेहमी खाण्याचे पदार्थच असावेत असे नाही. आपल्या जवळच्या व्यक्तींना निरोगी जीवनशैलीची प्रेरणा देणाऱ्या वस्तूही भेट देता येतील. योगा मॅट, रेझिस्टन्स बँड, हलके डंबेल्स, फिटनेस ॲक्सेसरीज किंवा चालण्यासाठी वापरता येणारे शूज हे चांगले पर्याय आहेत. याशिवाय घरातील शोभेची रोपे किंवा वेलनेस व्हाउचरही भेट म्हणून देता येईल. मात्र, भेटवस्तू निवडताना समोरच्या व्यक्तीची आवड आणि गरज लक्षात घ्या. त्यांना उपयोगी पडेल अशी वस्तू दिल्यास त्या भेटीचे महत्त्व अधिक वाढेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here