काही दिवसांपूर्वीच कोण होणार करोडपती हा शो सुरू झाला. या शोमध्ये यावेळी प्रथमच महिला सूत्रसंचालक दिसत आहे.बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी चाहत्यांना नेहमीच मोहित करत असते. यावेळी माधुरीचा पिवळ्या रंगाच्या आकर्षक साडीतील सुंदर आणि ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. तिचं मनमोहक हास्य, स्टायलिश लूक आणि मोहक पोजेस चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.माधुरी स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील काही आठवणी शेअर करण्यापासून ते मंचावरील पाहुण्यांना त्यांच्या स्वतः विषयी बोलतं करण्यापर्यंत प्रश्नांच्या दरम्यान होणाऱ्या संभाषणांना या खेळा इतकंच रंजक बनवत आहे.सुप्रसिद्ध नृत्त्यांगना, अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या शैलीत हे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.आतापर्यंत आपण तिचा अभिनय आणि डान्स पाहत आलो आहे. पण या शोमार्फत पहिल्यांदाच ती सूत्रसंचानकाच्या भूमिकेत पाहायला मिळतेय.सोनी मराठी या वाहिनीवर कोण होणार करोडपतीमध्ये आपल्या खेळकर संवादानं गप्पांची रंगत वाढवणाऱ्या माधुरीला यासाठी प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम माधुरी दीक्षित)