Home नाशिक कुंभमेळा Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती भाविकांना एकाच क्लिकवर, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट लाँच

Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती भाविकांना एकाच क्लिकवर, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट लाँच

0
Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती भाविकांना एकाच क्लिकवर, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट लाँच
सिंहस्थ कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती भाविकांना एकाच क्लिकवर, नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट लाँच फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी राज्य सरकारसह जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याला प्रारंभ झाला. ध्वजारोहणाचा सोहळा झाल्यानंतर औपचारिक पद्धतीने कुंभपर्वाच्या सोहळ्याला सुरवात होते, अशी सर्वत्र ख्याती आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्हीही उपमुख्यमंत्री, राज्यपाल, राज्यातील अनेक महत्त्वाचे मंत्री सह अनेक महत्त्वाचे मंडळी या सोहळ्याला उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याचे टायटल साँग आणि कुंभमेळ्याची अधिकृत वेबसाईट सुद्धा यावेळी लाँच करण्यात आली.

https://www.prahaar.in/2026/11/03/nashik-municipal-corporation-mission-to-clean-the-godavari-ahead-of-the-simhastha-kumbh-mela-80-workers-to-be-deployed/

सिंहस्थ कुंभपर्वाची औपचारिक सुरूवात झाल्यानंतर आता भाविकांना कुंभमेळ्यासंबंधित अधिकृत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळ सुरू केली आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या भाविकांसह विविध शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, धार्मिक संस्था, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील घटक आणि प्रसारमाध्यमांसाठी हे संकेतस्थळ माहितीचे महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. कुंभमेळ्यासंबंधित माहिती एकाच ठिकाणी मिळेल, या अनुषंगाने कुंभमेळा प्राधिकरणाने हे संकेतस्थळ सुरू करण्यामागचा प्रमुख उद्देश आहे. सर्व माहिती अधिकृत आणि अचूक प्राप्त व्हावी या अनुषंगाने संकेतस्थळ सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे.

संकेतस्थळ: https://simhasthamahakumbh.maharashtra.gov.in

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पर्वणी स्नानाच्या तारखा आणि व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, धार्मिक स्थळांची माहिती, प्रवासाचे नियोजन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि सुरक्षाविषयक सूचनांचा यामध्ये समावेश असेल. संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार असून, त्यात पुढील काळात अधिक माहिती आणि डिजिटल सेवांची भर पडणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/traffic-changes-in-nashiks-main-market-area-from-november-3-to-11-entry-closed-on-7-routes/

कुंभयात्रेचे नियोजन सुलभ होणार

सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व, इतिहास, परंपरा, प्रमुख मंदिरे, घाट आणि आखाड्यांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी विमानाने, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे पर्याय, तसेच स्थानिक प्रवासासंबंधी माहितीही भाविकांना मिळू शकेल. स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, निवास व्यवस्था, वाहनतळ आणि मदत कक्ष यांसारख्या आवश्यक सुविधांची माहितीही टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित सूचनांनाही संकेतस्थळावर महत्त्व दिले जाणार आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/jalgaon-two-special-superfast-trains-from-mumbai-and-pune-to-nagpur-relief-for-passengers-from-nashik-jalgaon-and-bhusawal-as-well/

अधिकृत माहिती एकाच क्लिकवर

सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी ही अनेक विभाग आणि संस्थांच्या समन्वयातून होणारी व्यापक प्रक्रिया आहे. त्यामुळे संकेतस्थळावरील अधिकृत माहिती जास्तीत जास्त भाविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय विभाग, जिल्हा प्रशासन, महापालिका, लोकप्रतिनिधी, पर्यटन व वाहतूक क्षेत्रातील संस्था, धार्मिक संस्था, निवास व्यवस्था पुरविणारे व्यावसायिक आणि प्रसारमाध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात येत आहे. विविध विभागांची अधिकृत संकेतस्थळे, समाजमाध्यमांवरील खाती, जनजागृती मोहिमा आणि संबंधित संस्थांच्या संपर्क यंत्रणांद्वारे या संकेतस्थळाची लिंक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविता येणार आहे. प्रसारमाध्यमांनीही कुंभमेळ्याशी संबंधित बातम्या आणि माहिती प्रसारित करताना अधिकृत संकेतस्थळाचा संदर्भ द्यावा, जेणेकरून नागरिकांपर्यंत विश्वासार्ह माहिती पोहोचण्यास मदत होईल. सिंहस्थ कुंभपर्वाच्या तयारीला वेग येत असताना भाविकांना योग्य माहिती, प्रवासाचे नियोजन आणि आवश्यक सुविधांबाबत मार्गदर्शन मिळावे, यासाठी हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here