Home ब्रेकिंग न्यूज Bollywood News : ‘5 कोटी दे नाहीतर….’ अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : ‘5 कोटी दे नाहीतर….’ अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

0
Bollywood News : ‘5 कोटी दे नाहीतर….’ अभिनेत्याला थेट धमकीचा फोन ; टायगर श्रॉफनंतर आणखी एक बॉलिवूड अभिनेता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर ?

Bollywood News : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्याला धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाखाली अभिनेता तुषार कपूर याच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. त्यानं स्वत:ची ओळख हॅरी बॉक्सर अशी सांगितली आहे. या धमकीचा फोन येताच, तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने तुषार कपूरकडे कथितरित्या 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली असून त्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला.

नेमकं प्रकरण काय ?

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात तुषार कपूरला आलेला कॉल हा फेक असल्याचा संशय मुंबई क्राइम ब्रांचने व्यक्त केला असून तपासकर्त्यांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्डिंग तपासले असता त्या कॉल रेकॉर्डिंगची तुलना हॅरी बॉक्सरच्या ऑडिओ सँपलशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आवाज विश्लेषणात दोन्ही आवाज जुळले नाहीत. त्यामुळे अभिनेत्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने तुषार कपूरला घाबरवण्यासाठी आणि दहशत निर्माण करण्यासाठी गँगचं नाव घेतलं असावे असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/03/tiger-shroff-news-mumbai-crime-branch-arrests-22-year-old-woman-in-tiger-shroff-shooting-case-number-of-accused-increases/

कलाकारांच्या सुरक्षेत वाढ

माहितीनुसार, या प्रकरणी अद्याप तरी कोणतीही एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. तुषार कपूरला धमकी मिळण्यापूर्वी टायगर श्रॉफवर गोळीबार झाला होता. त्यामुळे टायगर श्रॉफ प्रकरण ताजे असतानाच आता अशाप्रकारे लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने तुषार कपूरला धमकी देण्यात आल्याने बॉलिवूड मध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, टायगर श्रॉफ प्रकरणानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि आमिर खान यांच्यासह अनेक कलाकारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here