Home साप्ताहिक अर्थविश्व Bank Fraud Case: बँक घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, आणखी 53.95 कोटींची मालमत्ता जप्त

Bank Fraud Case: बँक घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, आणखी 53.95 कोटींची मालमत्ता जप्त

0
Bank Fraud Case: बँक घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, आणखी 53.95 कोटींची मालमत्ता जप्त
बँक घोटाळ्याप्रकरणी ED ची मोठी कारवाई, आणखी 53.95 कोटींची मालमत्ता जप्त प्रातिनिधिक फोटो

मुंबई: अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate- ED) पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड (पीएएल) शी संबंधित 2296 कोटी रुपयांच्या कथित बँक घोटाळ्याप्रकरणी 53.95 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या प्रकरणी, इडीने जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 546 कोटी इतकी आहे. इडीच्या मुंबई झोन- 1 ने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) जंगम आणि स्थावर मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. या प्रकरणात इडीने यापूर्वी जप्त केलेली मालमत्ता तब्बल 493 कोटी रुपयांची होती.

https://www.prahaar.in/2026/11/02/reliance-industries-shares-surge-8-market-value-increases-by-rs-1-29-lakh-crore-in-a-single-day/

सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW), मुंबईमध्ये केलेल्या गुन्हेगारी कट आणि फसव्या कर्ज व्यवहारांद्वारे 17 बँकांच्या ग्रुपची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने मनी लाँडरिंगचा तपास सुरू केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेडने स्टॉक आणि देयक विवरणपत्रे सादर करून कन्सोर्टियमकडून कर्ज घेतले. त्यानंतर ही कर्ज खाती अनुत्पादक मालमत्ता (Non Performing Assets- NPA) बनली. त्यावर अंदाजे 2296 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

 

तपासादरम्यान, ईडीला असे आढळून आले की, जेके शाह ग्रुपने विविध संस्था आणि व्यक्तींच्या माध्यमातून 110.54 कोटी रुपयांच्या गुन्हेगारी उत्पन्नाचे हस्तांतरण करण्यास कथितपणे मदत केली. हा ग्रुप गुन्हेगारी उत्पन्नाचा कथितपणे लाभार्थी देखील होता. त्यांच्या उत्पन्नातून जेके ग्रुपने विविध संस्था आणि वेगवेगळ्या व्यक्तींच्या ओळखीने काही रक्कम आपल्याकडे वळती करून घेतली. त्याला अंदाजे 70.25 कोटी रुपये मिळाले असून त्याने त्याचा वापर केल्याची माहिती ईडीने दिली आहे. तपासादरम्यान, ईडीने बँक फसवणुकीसंबंधित मनी लाँडरिंगच्या माध्यमातून पैशांचा कथित गैरवापर केला आहे का? याचा देखील तपास सुरू केला आहे.

https://www.prahaar.in/2026/11/02/upi-payment-digital-payment-facilities-available-from-the-burj-khalifa-to-universal-studios-in-singapore/

दरम्यान, इडीकडून या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने तपास सुरू केला आहे. CBI , मुंबई EOW आणि मुंबई EOB यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे तपास सुरू करण्यात आला होता. पारेख ॲल्युमिनेक्स लिमिटेड आणि इतर आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 420 आणि 120- B आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here