दिवाळीत घरच्या घरी बनवा काजू कतली; तोंडात टाकताच विरघळणारी सोपी रेसिपी!"

२ कप ताजे काजू, १ कप साखर, आणि अर्धा कप पाणी.  अगदी मोजक्या साहित्यात बनते ही मिठाई!  

सोबत घ्या १ चमचा तूप, थोडासा चांदीचा वर्ख आणि वेलची पूड स्वादासाठी. 

सर्वात आधी काजू मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घ्या. (लक्षात ठेवा, मिक्सर सतत न चालवता थांबवून फिरवावा).

आता कढईत साखर आणि पाणी एकत्र करून एकत्र पाक तयार करून घ्या. पाकात वेलची पूड टाका. 

 पाकात काजू पावडर हळूहळू घालून मिश्रण मंद आचेवर घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहा.  

 मिश्रण थोडे थंड झाल्यावर तूपाच्या मदतीने मळून घ्या आणि बटरपेपरवर हलक्या हाताने लाटून घ्या.  

 त्यावर चांदीचा वर्ख लावून आवडीनुसार डायमंड शेपमध्ये कापा! तयार आहे तुमची खमंग आणि सुंदर 'काजू कतली'.