मुंबई: बॉलिवूडचा किंग खान आज त्याचा 61 वा वाढदिवस साजरा करीत आहे. शाहरूख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधत त्याच्या अपकमिंग चित्रपटातील गाणं रिलीज करण्यात आलं आहे. निर्मात्यांनी ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाए’ हे गाणं रिलीज केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून फॅन्समध्ये, म्युझिक इंडस्ट्रीतील दोन प्रसिद्ध सिंगर, एड शीरन आणि अरिजीत सिंग गाणं रिलीज करणार असल्याची चर्चा होती. अखेर तो क्षण आज आला. एड शीरन आणि अरिजीत सिंगने शाहरूख खानच्या चित्रपटातील ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाए’ हे पहिलं गाणं रिलीज केलं आहे.
https://www.prahaar.in/2026/11/02/from-baazigar-to-jawan-9-iconic-films-of-bollywoods-king-khan-that-took-the-box-office-by-storm/
‘तू मिल जाए’ हे गाणं प्रसिद्ध ब्रिटीश सिंगर एड शीरन, प्रसिद्ध बॉलिवूड सिंगर अरिजीत सिंग आणि मधुबंती बागची हिने गायले आहे. या गाण्याला संगीत सचिन- जीगर या प्रसिद्ध जोडीने दिलं आहे. रोमँटिक आणि ॲक्शन असलेल्या ह्या गाण्याने अवघ्या काही तासातच चाहत्यांचे मन जिंकले. शाहरूख खान सोबत दीपिका पादुकोणनेही चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर केलेली आहे. चित्रपटातील या पहिल्या- वहिल्या गाण्यनेच सोशल मीडियावर सर्वांचेच मन जिंकले. सध्या सोशल मीडियावर हे गाणं कमालीचं ट्रेंड होताना दिसत आहे. ‘ओम शांती ओम’, ‘हॅप्पी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ सह अनेक चित्रपटांमध्ये शाहरूख आणि दीपिकाने एकत्रित स्क्रीन शेअर केलेली आहे. या सर्व सुपर डुपर हिट चित्रपटांनंतर आता पुन्हा एकदा ‘किंग’ चित्रपटातून सुद्धा ही जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
View this post on Instagram
‘तू मिल जाए’ गाण्याबद्दल बोलायचे तर, किंग खानच्या फिटनेसमुळे गाण्याला चार चाँद लागले आहेत. गाण्यामध्ये शाहरूख आणि दीपिकाने केलेल्या रोमान्समुळे आणि जबरदस्त ॲक्शनमुळे पुन्हा एकदा सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ‘पठाण’मधील ‘बेशरम रंग’ गाण्यामध्ये केलेल्या अफलातून केमिस्ट्रीनंतर पुन्हा एकदा आता ‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाए’ गाण्यातील अफलातून केमिस्ट्रीची चर्चा होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर ह्या गाण्याची जोरदार चर्चा होताना दिसत असून चाहत्यांमध्ये चित्रपटाच्या टीझरची, इतरत्र गाण्यांची आणि ट्रेलरची प्रचंड उत्सुकता आहे.
https://www.prahaar.in/2026/11/02/anuj-thakur-death-popular-actor-anuj-thakur-passes-away-at-the-age-of-30/
चित्रपटाविषयी सांगायचे तर, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, ‘किंग’ चित्रपट 2026च्या अखेरीस रिलीज होणार आहे. 24 डिसेंबरला हा चित्रपट भारतासह जगभरामध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणसोबत शाहरूखची लेक अभिषेक बच्चन, अनिल कपूर, सुहाना खान, राणी मुखर्जी, जयदीप अहलावत, राघव जुयाल आणि अभय वर्मा अशी तगडी स्टारकास्ट प्रमुख भूमिकेत आहे. गौरी खान, सिद्धार्थ आनंद आणि ममता आनंद यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून यशराज फिल्म्स स्टुडिओ आणि पेन स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट रिलीज होणार आहे.