Home अध्यात्म Diwali 2026 : दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर टाळा ‘या’ 7 चुका !

Diwali 2026 : दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर टाळा ‘या’ 7 चुका !

0
Diwali 2026 : दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळवायची असेल तर टाळा ‘या’ 7 चुका !
Photo AI generated आहे.

Diwali 2026 : दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा. हिंदू धर्मातील दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. दिवाळीत लक्ष्मी देवी आणि गणरायाची विशेष पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दिवाळीच्या दिवशी आपण विधीपूर्वक लक्ष्मीपूजन केल्याने घरात सुख, शांती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदते. तसेच आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होऊन धनलाभाचे योग निर्माण होतात, असे मानले जाते. त्यामुळे दिवाळीत देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही नियमांचं पालन करणं व त्यावर योग्य तो उपाय करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवाळीत काही परंपरांचे पालन केले जाते.

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी काही नियम व उपाय

1. घराची स्वच्छता राखा
असं म्हणतात की, स्वच्छ आणि प्रसन्न वातावरण असलेल्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे दिवाळीपूर्वी घरातील धूळ, कचरा आणि अनावश्यक वस्तू काढून टाकाव्यात. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं.

2. दारासमोर आकर्षक रांगोळी काढणे
दिवाळीत घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर सुंदर व आकर्षक रांगोळी काढणं शुभ मानलं जातं. तसेच दरवाजावर आंब्याच्या पानांचं किंवा फुलांचं तोरण लावावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

3. सायंकाळी दिवे लावणे
दिवाळीच्या दिवसांत मुख्यतः संध्याकाळी घराच्या मुख्य दाराजवळ, देवघरात आणि अंगणात दिवे लावले जातात.पारंपरिक पद्धतीने तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करणं शुभ मानलं जातं. घरातील रोषणाईमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

4. लक्ष्मीपूजन करताना स्वच्छ वस्त्र परिधान करणे
लक्ष्मीपूजन करताना घरात स्वच्छ आणि सुंदर वेगवेगळ्या रंगांची वस्त्रं परिधान करावीत. पूजेच्या ठिकाणी लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून त्यावर देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर फुलं, अक्षता, हळद-कुंकू आणि नैवेद्य अर्पण करून यथोचित पूजा करावी.

https://www.prahaar.in/2026/11/02/train-coaches-without-engine-seven-railway-coaches-traveled-for-6-km-without-an-engine-bengaluru-chennai-rail-services-disrupted-a-major-disaster-averted-thanks-to-the-alertness-of-a-level-crossing/

5. घरात वादविवाद, भांडण टाळा
याशिवाय दिवाळीच्या दिवसांत घरात शांतता आणि आनंदाचं वातावरण ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. एकमेकांशी प्रेमाने वागावं. घरात आनंदी आणि शांत वातावरण ठेवणे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांशी अनावश्यक वादविवाद, कटू बोलणं आणि भांडणं टाळावीत.

6. दानधर्म करणे
दिवाळीच्या शुभ प्रसंगी गरजू व्यक्तींना अन्न, कपडे, धान्य किंवा आपल्या क्षमतेनुसार आर्थिक मदत करणं पुण्यकारक मानले जाते. अनेकवेळा निःस्वार्थ भावनेने केलेलं दान देवी लक्ष्मीला प्रिय असतं. त्यामुळे नेहमी इतरांना मदत करा.

7. अन्नाचा आणि पैशांचा अपव्यय टाळा
तसेच देवी लक्ष्मीला धन आणि समृद्धीची देवता मानलं जातं. त्यामुळे दिवाळीत अन्न, पाणी आणि पैशांचा अनावश्यक अपव्यय करू नये. गरजेनुसारच खर्च करा आणि अन्नाचा आदर करा.

दरम्यान, देवी लक्ष्मीला कमळाचं फूल अत्यंत प्रिय आहे, असे वर्णन धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतं. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवीला कमळाचं फूल अर्पण करावं. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते. दिवाळीच्या काळात लक्ष्मीपूजनाच्या वेळी ‘ॐ श्रीं महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा 108 वेळा जप करा ते शुभ मानलं जातं. श्रद्धेनुसार, या मंत्राचा जप केल्याने मन एकाग्र होतं आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच दिवाळीत देवी लक्ष्मीला खीर, लाडू किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा. हा उपाय घरातील आनंद आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. काही ठिकाणी लक्ष्मीपूजनाच्या वेळी नाणी आणि धनाचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दिवाळीत घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा स्वच्छ करावी. हा उपाय आर्थिक स्थैर्य आणि समृद्धीसाठी शुभ मानला जातो.

(Disclaimer: या बातमीतील माहिती धार्मिक श्रद्धा आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here