Home ब्रेकिंग न्यूज Anuj Thakur Death: लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूरचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन

Anuj Thakur Death: लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूरचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन

0
Anuj Thakur Death: लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूरचे वयाच्या ३०व्या वर्षी निधन
Photo: Instagram (Anuj Thakur)

Anuj Thakur Death: टीव्ही इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता अनुज ठाकूर याचे वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निधन झाले आहे. ‘बंधन सात जन्मों का’ आणि ‘धूम मचाओ धूम’ सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये अनुजने काम केले आहे. अनुजच्या निधनाच्या बातमीला त्याचा जवळचा मित्र आणि कास्टिंग दिग्दर्शक रुपेश सोनार याने दुजोरा दिला आहे. अनुजच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. झोपेतच अनुज ठाकूरला हृदयविकाराचा झटका आला असल्याची माहिती समोर आली आहे. अनुजच्या आईने त्याला रूममध्ये झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. पण अनुज ठाकूर काही उठला नाही. त्यानंतर त्याचं निधन झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

रुपेश आणि अनुज यांची ओळख एका मालिके दरम्यान झाली. त्यांची पहिली भेट ‘बंधन सात जन्मों का’च्या सेटवर झाली होती. मागील १८ वर्षांपासून ते एकमेकांना ओळखत होते. साहजिकच, त्यांची मैत्री इतकी घट्ट होती की, रुपेश अनुजला त्याचा धाकटा भाऊ मानत होता. अनुजच्या निधनाच्या १० दिवस आधी रुपेश त्याला भेटला होता. त्यावेळी अनुज खूप आनंदी होता, खुश होता आणि अभिनय क्षेत्रात परत येण्याची प्लॅनिंगही करत होता, असे रुपेशने सांगितले. तसेच अनुजचा मृत्यू त्याला फिट्स आल्यामुळे झाला असल्याचे रुपेशने सांगितले. मी शनिवारी त्याच्या कुटुंबाची भेट घेतली. तेव्हा मला समजले की, अनुजला फिट्स (seizures) आल्या होत्या, ज्यामुळे त्याचे निधन झाले. (Anuj Thakur Death Reason)

https://www.prahaar.in/2026/11/02/trouble-mounts-for-nora-fatehi-court-alleges-actresss-conduct-is-inappropriate/

रुपेशची अनुजला श्रद्धांजली वाहणारी पोस्ट

तू आता आमच्यात नाहीस, यावर अजूनही विश्वास बसत नाहीये. तू केवळ एक मित्र नव्हतास, तर माझ्यासाठी लहान भावासारखा होतास. आपण मिळून कितीतरी प्रकल्प आखले होते; तुझ्या सुरुवातीच्या दिवसांतील संघर्ष आणि त्यानंतरचा तुझा प्रवास, हे सर्व मला अजूनही आठवतंय. आयुष्य खरोखरच अनपेक्षित आहे. तू इतक्या लवकर निघून गेलास, हे स्वीकारणे अत्यंत वेदनादायी आहे. ही बातमी अजूनही खरी वाटत नाहीये. भावा, तुझी सदैव आठवण येत राहील. शांततेत विश्रांती घे. मंगळवारची सकाळ.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here