Home क्रीडा IND vs NZ: वनडे मालिकेत रोहित शर्मा नाही तर विराट कोहली ठोकेल शतक! दिग्गज खेळाडूने वर्तवलं भाकीत

IND vs NZ: वनडे मालिकेत रोहित शर्मा नाही तर विराट कोहली ठोकेल शतक! दिग्गज खेळाडूने वर्तवलं भाकीत

0
IND vs NZ: वनडे मालिकेत रोहित शर्मा नाही तर विराट कोहली ठोकेल शतक! दिग्गज खेळाडूने वर्तवलं भाकीत
IND vs NZ: वनडे मालिकेत रोहित शर्मा नाही तर विराट कोहली ठोकेल शतक! दिग्गज खेळाडूने वर्तवलं भाकीत (Photo: ANI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका होत आहे. 4 नोव्हेंबरपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. या मालिकेत एकूण पाच सामने होणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींची उत्साह शिगेला पोहोचला आहे. कारण हे दोघेही आता फक्त वनडे फॉर्मेटमध्ये खेळत असल्याने क्रीडाप्रेमींना या दोघांना खेळताना पाहण्याची पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा आक्रमक अंदाज पाहण्याची पर्वणी असणार आहे. असं असताना या मालिकेपूर्वी भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने एक मोठं विधान केलं आहे. चेतेश्वर पुजाराच्या मते, न्यूझीलंडच्या वेगवान आणि स्विंग असलेल्या चेंडूंचा सामना करणं भारतीय सलामीवीरांना कठीण आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या तुलनेत विराट कोहलीला शतक ठोकण्याची सर्वाधिक संधी आहे. जियोस्टारवर बोलताना पुजाराने या दोन्ही खेळाडूंच्या क्रमाबाबत आणि त्यांच्या भूमिकेबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं.

काय म्हणाला चेतेश्वर पुजारा?

चेतेश्वर पुजारा म्हणाला की, रोहित शर्माचं काम पावरप्लेमध्ये वेगाने धावा करून संघाला चांगली सुरूवात करून देण्याचं आहे. पण न्यूझीलंडच्या परिस्थितीत सलामीच्या फलंदाजांना नव्या चेंडूंचा सामना करताना काळजी घ्यावी लागेल. त्यामुळे रोहित शर्माला फलंदाजी करताना अडचण येऊ शकते. पण या उलट विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे वनडे फॉर्मेटमध्ये डावाला दिशा देण्याची अधिक संधी मिळते. पुजाराच्या मते, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन डाव सांभाळत शतक करणं थोडं सोपं असतं. त्यामुळे रोहित शर्मापेक्षा विराट कोहली पुढे असणार आहे. असं असलं तरी दोन्ही खेळाडू फॉर्मात आहेत, हे विसरून चालणार नाही.

https://www.prahaar.in/2026/11/01/ind-vs-nz-mitchell-santner-makes-a-big-statement-regarding-the-series-after-winning-the-fifth-t20-match/

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत विराट कोहलीने नाबाद 139 धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने तिन्ही सामन्यात मिळून 225 धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजारा फक्त विराट-रोहितबाबत मालिकेत काय घडणार? यावरच बोलला नाही तर भारतीय संघ दोन भागात विभागल्याबाबतही भाष्य केलं आहे. पहिल्या तीन सामन्यात एक संघ आणि शेवटच्या दोन सामन्यात काही खेळाडूंना वगळून संघ असणार आहे. कारण कसोटी मालिकेच्या तयारीसाठी असा निर्णय घेतला गेला आहे. पण यामुळे न्यूझीलंडला फायदा होईल, असं मत चेतेश्वर पुजारा यांनी व्यक्त केलं आहे. कारण न्यूझीलंडचा संघ पाचही सामन्यात एकाच कॉम्बिनेशनसह खेळणार आहे. त्यामुळे शेवटच्या दोन सामन्यात भारतीय संघाला अडचणीचं ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here