Home क्रीडा संजू सॅमसनसाठी काय पण..! ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याची आर अश्विनने केली बोलती बंद

संजू सॅमसनसाठी काय पण..! ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याची आर अश्विनने केली बोलती बंद

0
संजू सॅमसनसाठी काय पण..! ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याची आर अश्विनने केली बोलती बंद
संजू सॅमसनसाठी काय पण..! ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याची आर अश्विनने केली बोलती बंद (Photo: ANI)

भारत न्यूझीलंड टी20 मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 3-2 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात घातली. भारताने ही मालिका जिंकली असली तरी संजू सॅमसन त्याच्या खेळीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. संजू सॅमसनने या मालिकेतील पहिल्या सामन्यात 67 धावा केल्या होत्या. त्यामुळे न्यूझीलंडची खेळपट्टीवर कमाल करेल असं वाटलं होतं. पण पुढच्या चारही सामन्यात त्याची बॅट शांत राहिली. चौथ्या आणि पाचव्या टी20 सामन्यात तर त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नाही.  यापूर्वी अश्विनने आपल्या यूट्यूब चॅनेलवरून संजूच्या आक्रमक खेळाचे समर्थन केले होते आणि त्याला पाठिंबा दिला होता. पण अंतिम सामन्यात संजू 4 धावांवर बाद झाल्यानंतर एका युझरने अश्विनला टॅग करत डिवचलं होतं. संजू सॅमसनच्या या कामगिरीनंतर एका ट्रोलर्सने आर अश्विनला खडे बोल सुनावले. त्यानंतर आर अश्विनने त्याच्या शैलीत त्याला उत्तर दिलं आणि गप्प केलं.

आर अश्विन संजू सॅमसनच्या पाठिशी

एका युजर्सने आर अश्विनला टॅग करत लिहिलं की, तुझी पहिली आवड असलेला संजू सॅमसन संपूर्ण मालिकेत फूस झाला. या टीकेवर आर अश्विनने सडेतोड उत्तर देत लिहिलं की, “संजू मेरा फर्स्ट चॉईस है, तुम्हारा फुल-टाइम ऑब्सेशन.” या मालिकेत संजू सॅमसनचा क्रम दोनदा बदलला गेला. पहिल्या सामन्यात त्याने ओपनिंग केली आणि 67 धावांची खेळी केली. पण दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर पाठवलं गेलं. कारण या दोन सामन्यात इशान किशन दुखापतीमुळे खेळला नाही. त्यामुळे इशान किशनसोबत वैभव सूर्यवंशीने ओपनिंग केली.

https://www.prahaar.in/2026/11/01/ind-vs-nz-t20-what-went-wrong-in-the-last-two-matches-against-new-zealand-captain-shreyas-iyer-points-out-the-errors/

संजू सॅमसनने टी20 मालिकेतील पाच सामन्यात एकूण 107 धावा केल्या. पहिल्या मालिकेतील 67 धावा सोडल्या तर इतर चार डावात त्याने एकूण 40 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात 14, तिसऱ्या सामन्यात 18 धावा केल्या. तर चौथ्या आणि पाचव्या सामन्यात 4-4 धावा करून तंबूत परतला. आता संजू सॅमसनची पुढच्या टी20 मालिकेत निवड होते की नाही? हा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात डिसेंबर 2026 मध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here