Home एक्सक्ल्युजिव्ह केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!

0
केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट; महाराष्ट्राच्या वाट्याला 7 हजार कोटी!
केंद्र सरकारकडून राज्यांना दिवाळी भेट फोटो सौजन्य: ANI News

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं देशातील सर्व राज्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. दिवाळीच्या आधी केंद्र सरकारने सर्व राज्यांना करपरतावा जारी केला आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या या भांडवलीच्या पाठिंब्यामुळे विकासकामांना मोठी चालना मिळण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना या निधीचं वाटप केलं आहे. केंद्रानं राज्यांना एकूण 1 लाख 09 हजार कोटी रुपयांचा कर हस्तांतरण केलं. केंद्राच्या अर्थ मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. केंद्रानं महाराष्ट्र राज्याला 7022 कोटी कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे. दिवाळी सणाच्या पूर्वी केंद्र सरकारने राज्यांसाठी कर हस्तांतरणाचा आगाऊ हप्ता जारी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/01/ujjain-hotel-tragedy-four-workers-die-due-to-toxic-gas-leak-while-cleaning-tank-sparks-panic-in-the-area/

केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना जाहीर केलेल्या निधीमध्ये उत्तर प्रदेशला सर्वाधिक म्हणजेच 19,208 कोटी रुपये देऊ केले आहेत. यानंतर बिहारला 10,845 कोटी रुपये, मध्य प्रदेशला 8010 कोटी रुपये आणि पश्चिम बंगालला 7866 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला 7022 कोटी रुपये आले आहेत, तर राजस्थानला 6460 कोटी रुपये आणि ओडिशाला 4819 कोटी रुपये मिळाले आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्यांना देऊ केलेल्या ह्या निधीमुळे राज्याच्या आर्थिक गणिताला मोठी चालना मिळणार आहे. दक्षिण भारतातील राज्यांसह देशातील इतर राज्यांनाही केंद्र सरकारने विकास कामांना गती देण्यासाठी निधी दिला आहे.

 

दक्षिण भारतातील राज्यांचा विचार केला तर, आंध्र प्रदेशला 4597 कोटी रुपये, कर्नाटकला 4504 कोटी रुपये, तामिळनाडूला 4466 कोटी रुपये, तेलंगणाला 2370 कोटी रुपये आणि केरळला 2597 कोटी रुपये निधी मिळाला आहे. पश्चिम भारतातील गुजरातला 4094 कोटी रुपये मिळाले आहेत, तर गोव्याला सर्वात कमी म्हणजे 398 कोटी रुपये निधी मिळाला आहे. मध्य आणि उत्तर भारतातील राज्याला छत्तीसगडला 3602 कोटी रुपये, हरियाणाला 1484 कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला 996 कोटी रुपये, झारखंडला 3660 कोटी रुपये, पंजाबला 2176 कोटी रुपये आणि उत्तराखंडला 1244 कोटी रुपये मिळाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/11/01/cyclone-murasu-threatens-andhra-pradesh-coastline-with-winds-up-to-100-kmph-imminent-landfall-details-and-weather-warning-issued/

ईशान्येकडील राज्यांमध्ये आसामला 3552 कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशला 1476 कोटी रुपये, मणिपूरला 682 कोटी रुपये, मेघालयाला 688 कोटी रुपये, मिझोरमला 615 कोटी रुपये, नागालँडला 524 कोटी रुपये, सिक्कीमला 365 कोटी रुपये आणि त्रिपुराला 699 कोटी रुपये निधी जाहीर झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here