Home एक्सक्ल्युजिव्ह महाराष्ट्रातील 19 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’!

महाराष्ट्रातील 19 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’!

0
महाराष्ट्रातील 19 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक’!
फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

नवी दिल्ली : देशातील पोलीस दल, सुरक्षा यंत्रणा आणि तपास यंत्रणांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदका’साठी वर्ष २०२६ मध्ये विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि केंद्रीय पोलीस संघटनांमधील एकूण 490 अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 19 अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असून राज्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या पदकाद्वारे पोलीस व सुरक्षा यंत्रणांमधील उल्लेखनीय योगदानाचा गौरव केला जातो. उत्कृष्ट कार्याची दखल घेणे, उच्च व्यावसायिक कार्यमानके प्रोत्साहित करणे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविणे हा या पदकाचा प्रमुख उद्देश आहे. दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी या पदकांची घोषणा केली जाते.

https://www.prahaar.in/2026/10/31/sardar-vallabhbhai-patels-birth-anniversary-occasion-citizens-from-naxal-affected-areas-participated-as-special-guests-conveying-a-message-of-peace-development-and-national-unity/

महाराष्ट्रातील पदक प्राप्त अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची यादी:

  • विशेष कृती दल:

    1. लक्ष्मी गौतम – सह पोलीस आयुक्त

    2. विशाल हिरालाल ठाकूर – पोलीस उपायुक्त

    3. आत्माजी शिवाजी सावंत – पोलीस निरीक्षक

    4. अमोल माधव माळी – सहाय्यक पोलीस निरीक्षक

    5. रामदास तात्याबा कदम – सहाय्यक पोलीस निरीक्षक

    6. स्वप्नील रामदास काळे – पोलीस उपनिरीक्षक

    7. शिवप्रसाद बाळासाहेब पठारे – पोलीस अंमलदार

  • तपास विभाग:

    1. कुमार चिंथा – सहाय्यक पोलीस अधीक्षक

    2. ऋषिकेश रेड्डी – पोलीस अधीक्षक

    3. रामेश्वर रेंगे – सहाय्यक पोलीस आयुक्त

    4. माणिक बेदरे – पोलीस निरीक्षक

    5. डॉ. एम. सी. व्ही. महेश्वर रेड्डी – अपर पोलीस अधीक्षक

    6. प्रभावती एकुर्के – पोलीस निरीक्षक

    7. रितेश आहेर – पोलीस निरीक्षक

    8. ईश्वर काटकर – अपर पोलीस अधीक्षक

    9. रामचंद्र मोहिते – पोलीस निरीक्षक

    10. अश्विनी अभिजीत पाटील – पोलीस निरीक्षक

    11. पूजा गायकवाड – उप पोलीस अधीक्षक

  • न्यायवैद्यक शास्त्र विभाग:

    1. डॉ. विजय जयवंतराव ठाकरे – संचालक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here