सिंहस्थ कुंभपर्वाच्या मंगलमय पर्वात नाशिकच्या गोदावरी तीरावर आणखी एका ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद झाली आहे. तब्बल ६ हजार २३३ जणांनी एकत्रितपणे गोदावरी आरतीचे पठण करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला. भक्ती, श्रद्धा आणि सनातन संस्कृतीचा अनोखा संगम घडवणाऱ्या या सोहळ्यामुळे नाशिकचे नाव जागतिक स्तरावर अधोरेखित झाले आहे.




