वेस्ट इंडिजचा संघ बांगलादेश दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत पहिला सामना ढाक्यात पार पडला. नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला, पण निकाल मात्र वेस्ट इंडिजच्या बाजूने गेला. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बांगलादेशने सर्व गडी गमवून 272 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करातना वेस्ट इंडिजचा संघ 245 धावांवर गारद झाला. यासह पहिल्या डावात बांगलादेशने 27 धावांची आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या डावात बांगलादेशचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. बांगलादेशचा संपूर्ण संघ 142 धावांवर गारद झाला. पहिल्या डावातील 27 धावांची आघाडी आणि 142 धावा अशा मिळून 169 धावा केल्या. तसेच विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं. वेस्ट इंडिजने हे आव्हान 2 गडी गमवून पूर्ण केलं. यासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलटफेर
बांगलादेशने वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना गमावल्याने भारतीय संघाला फायदा झाला. या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ 55.56 विजयी टक्केवारीसह चौथ्या क्रमाकावंर होता. त भारतीय संघ 51.52 टक्क्यांसह पाचव्या स्थानावर होता. बांगलादेशचा वेस्ट इंडिजविरुद्ध पहिलाय कसोटी सामन्यात पराभव झाला आणि गुणातालिकेत उलथापालथ झाली. भारतीय संघ पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानी, तर बांगलादेशची चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. भारताच्या विजयी टक्केवारीत काहीच फरक पडलेला नाही. पण बांगलादेशने सामना गमावल्याने विजयी टक्केवारी कमी झाली आहे. बांगलादेशचा संघ 47.62 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे. या विजयाचा वेस्ट इंडिजला विशेष फायदा झाला नाही, पण विजयी टक्केवारी 26.92 पर्यंत वाढली आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/ind-vs-nz-4th-t20-new-zealand-rewrites-history-in-auckland-in-the-fourth-match-defeats-india-by-87-runs/
भारतासाठी न्यूझीलंड कसोटी मालिका महत्त्वाची
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन सामन्यात भारताला काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला क्लिन स्विप दिला तर भारताला थेट दुसरं स्थान गाठण्याची संधी आहे. इतकंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंति फेरीच्या शर्यतीत असेल. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका भारतासाठी महत्त्वाची असणार आहे.