उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (फोटो: प्रहार)
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त देहरादून येथील पॅव्हेलियन ग्राउंडवर ‘रन फॉर युनिटी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी स्वतः सहभाग घेत धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून दौडीला सुरुवात करून दिली. यावेळी तरुणांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. देशप्रेमाच्या वातावरणात उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा मजबूत संदेश देण्यात आला. (Photo: Prahaar)या महत्त्वपूर्ण सोहळ्यात मुख्यमंत्री धामी यांनी प्रांतीय रक्षक दल (PRD) जवानांसाठी मोठी घोषणा केली. पीआरडी जवानांच्या मानधनात लवकरच वाढ करण्यात येणार असून, त्याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे राज्यातील हजारो पीआरडी जवानांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांच्या सेवेचा उचित सन्मान होणार आहे. (Photo: Prahaar) ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उत्तराखंडमधील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ‘मुख्यमंत्री क्रीडा क्लब’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे तळागाळातील प्रतिभावान खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळेल. तसेच, मुख्यमंत्री चॅम्पियनशिप ट्रॉफीमधील खेळांची संख्या ३२ वरून थेट ५० पर्यंत वाढवण्यात येणार असून विजेत्यांची बक्षीस रक्कमही दुप्पट केली आहे. (Photo: Prahaar)देहरादूनमधील आमवाला येथील युवा केंद्रालगतची रिक्त जागा आता युवा कल्याण विभागाकडे हस्तांतरित केली जाणार आहे. या जागेवर अत्याधुनिक अशा मिनी स्टेडियमची आणि ‘अग्निवीर प्रशिक्षण केंद्र’ची उभारणी केली जाईल. यामुळे स्थानिक युवकांना केवळ खेळाच्या आधुनिक सुविधाच मिळणार नाहीत, तर सैन्यभरतीच्या कठीण तयारीसाठी योग्य ते प्रशिक्षणही सहज उपलब्ध होईल. (Photo: Prahaar)भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्या. आपली सर्वप्रथम ओळख केवळ भारतीय असली पाहिजे, असे सांगत त्यांनी सर्वांना एकत्र येऊन देशाच्या विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले. तसेच, तरुणांनी खेळांना आयुष्याचा भाग बनवून नशेपासून दूर राहण्याचा आणि ‘व्यसनमुक्त उत्तराखंड’चा संकल्प करण्याचा संदेश दिला. (Photo: Prahaar)कार्यक्रमादरम्यान बद्रीनाथ धामहून परतत असताना जोशीमठ परिसरात झालेल्या दुर्दैवी हेलिकॉप्टर दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त केल्या. दिवंगत आत्म्यांना सद्गती लाभो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे अदारणीय दुःख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना त्यांनी केली. (Photo: Prahaar)