Home एक्सक्ल्युजिव्ह सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभ मुहूर्त समीप! ध्वजारोहणानंतर होणार सुरूवात, धर्मध्वजाची वैशिष्ट्य जाणून घ्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभ मुहूर्त समीप! ध्वजारोहणानंतर होणार सुरूवात, धर्मध्वजाची वैशिष्ट्य जाणून घ्या

0
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभ मुहूर्त समीप! ध्वजारोहणानंतर होणार सुरूवात, धर्मध्वजाची वैशिष्ट्य जाणून घ्या

नाशिकमध्ये 12 वर्षानंतर कुंभमेळा होत आहे. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 31 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी 12.02 मिनिटांनी रामकुंड आणि कुशावर्त येथे ध्वजारोहण होणार आहे. धर्मध्वजा फडकावल्यानंतर कुंभमेळ्याला सुरूवात होणार आहे. या धर्मध्वजावरील चिन्हांनी भाविकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे धर्मध्वज फडकवला जाणार आहे. या दोन्ही धर्मध्वजांची खासियत आहे. त्यावर असलेल्या चिन्हांचा अर्थ आहे. त्यामुळे धर्मध्वजाबाबत उत्सुकता आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर (Photo: @girishdmahajan Twitter)
त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी धर्मध्वज फडकवला जाणार आहे. या धर्मध्वजावर विविध शुभ चिन्ह आहे. त्यावर मगर असून गोमातेच वाहन म्हणून रेखाटलं आहे. गोमाता आणि कुशावर्त तीर्थाशी असलेल्या पवित्र्य नात्याचं प्रतिक आहे. (Photo: @girishdmahajan Twitter)
गुरू ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरूवात होते. म्हणून त्र्यंबकेश्वर येथील धर्मध्वजावर सिंहचं चित्र आहे. तसेच बारा राशींचं प्रतिक म्हणून 12 घंट्या आहेत. या 12 राशीतून गुरूचं भ्रमण होतं म्हणून ते प्रतिक दाखवलं गेलं आहे. तसेच सूर्य आणि चंद्र आहेत. (Photo: @girishdmahajan Twitter
त्र्यंबकेश्वर येथील ध्वजावर दशदिशांचे निर्देश आहेत. यात दशदिशातून येणाऱ्या देवतांच्या स्वागताची व्यापक भावना आहे. तसेच मांगल्य आणि अध्यात्मिक भाव व्यक्तकरणारी चिन्ह आहेत. यावर ह्रीं हे बीजाक्षर वैश्विक चेतना, माया आणि सृजनशक्तीशी जोडलेलं मानलं जातं. (Photo: @girishdmahajan Twitter)
रामकुंडावरही ध्वजारोहण होणार आहे. या ध्वजावर शुभचिन्हे आहेत. मुख्य ध्वजावर सिंह शौर्याचं प्रतीक आहे. धार्मिक विवेचनात गुरू ग्रहाचं वाहन म्हणून वर्णन आहे. गंगामातेचं वाहन आणि दीर्घायुष्याचं प्रतिक असलेलं मगर चिन्ह आहे. (Photo: @girishdmahajan Twitter)
रामकुंडावरील ध्वजावर अमरत्व,मुक्ती, दैवी शक्तीचं प्रतीक आणि कुंभ परंपरेचं पवित्र स्मृती जपणारं अमृतकुंभ हे प्रतीक आहे. श्री गंगा गोदावरी मंदिराच्या ध्वजावरील मगर आणि गोदामातेच्या वाहनाचं आणि दीर्घायुष्याचं प्रतीक आहे. (Photo: @girishdmahajan Twitter)
रामकुंडावरील ध्वजावर सूर्य चंद्र असेपर्यंत सिंहस्थाची परंपरा सुरू राहिल अशी भावना असणारे प्रतीक आहेत. धार्मिक विवेचनानुसार विघ्नहर्त्या श्रीगणेशाचं प्रतीक आहे. तसेच ओम हे सर्वव्यापकतेचं प्रतीक आणि श्री हे विजयाचं प्रतिक असलेलं चिन्ह आहे. (Photo: @girishdmahajan Twitter)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here