उत्तराखंड: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम मधून परत येत असलेले एक हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या हॅलिकॉप्टरमध्ये, पाच प्रवाशांसग पायलट अशा सहा जणांना घेऊन जाणारं एक हॅलिकॉप्टर आज बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर धुकं असल्यामुळे ही घटना घडली असल्याचं बोललं जात आहे. या घटनेला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुजोरा दिला आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/indian-railways-launches-parcel-service-doorstep-pickup-and-delivery-of-railway-parcels-now-available-in-delhi-and-mumbai/
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये बद्रीनाथहून जोशीमठकडे जाणारं हॅलिकॉप्टर बेपत्ता झाले आहे. पाच प्रवाशांसह एका पायलट अशा सहा जणांना घेऊन जाणाऱ्या हॅलिकॉप्टरला अचानक लोकेशन मिळानासे झाले. त्यामुळे हॅलिकॉप्टर बेपत्ता झाले. बद्रीनाथ धाम आणि जोशीमठ अशा दोन ठिकाणांदरम्यान, हॅलिकॉप्टर बेपत्ता झाल्याची माहिती उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी माध्यमांना दिली. हॅलिकॉप्टर अचानक गायब झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या विमानाचा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच चमोली जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हॅलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.
https://www.prahaar.in/2026/10/30/i-will-be-the-one-to-perform-the-first-puja-three-wives-get-into-a-heated-argument-right-inside-a-police-station-over-the-karva-chauth-rituals/
यासंबंधितचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने देखील दिले आहे. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये, दुपारी 02.21 वाजता, जोशीमठ परिसरातील चाई गावामध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती जोशीमठच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडून (एसडीएम) देण्यात आली आहे. या संदर्भात, बद्रीनाथवरून सहस्त्रधारकडे जाणाऱ्या चमोली जिल्ह्यातील चाई गावाजवळील लष्करी छावणीजवळ ट्रान्स भारत कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. हेलिकॉप्टरमध्ये 5 प्रवासी आणि 1 पायलट असल्याची अधिकृत माहिती आहे. अपघात किंवा हेलिकॉप्टर कोसळण्याबाबतचा संपूर्ण तपशील लवकरात लवकर देण्यात येतील, अशी माहिती UCADA च्या अधिकाऱ्यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.
Chamoli, Uttarakhand | At 14:21 hrs, information was received from the SDM Joshimath regarding the crash landing of a helicopter above Chai village in the Joshimath area. In this regard, UCADA officials stated that the location of a Trans Bharat helicopter, which was flying from Badrinath to Sahastradhara, is showing near the Army Camp above Chai village. There are 05 passengers and 01 pilot on board. Complete details regarding the crash or crash landing are not yet available: Sub-Inspector Manohar Kanyal, Joshimath Post
— ANI (@ANI) October 30, 2026
उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाने (UCADA) दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्स भारत एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे VT-HCX हे हेलिकॉप्टर दुपारी सुमारे 1.14 वाजता बद्रीनाथहून डेहराडूनमधील सहस्रधारासाठी निघाले. जोशीमठच्या घाट माथ्यावरून जात असताना हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला. याचवेळी, ट्रॅकिंग सिस्टीमनेही हेलिकॉप्टरचे स्थान दाखवणे बंद केले. हेलिकॉप्टरचा शोध सुरू करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच, भारतीय लष्कर, चमोली जिल्हा प्रशासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) पथकांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले. याव्यतिरिक्त, आयटीबीपीचे एक पथक अपघातस्थळी पाठवण्यात आले आहे. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांशी अद्याप संपर्क झालेला नाही. त्यांची ओळख चंद्रकांत, अथर्व, आकाश, राजश्री आणि दिनेश अशी पटली आहे. पायलटसह हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण होते.
https://www.prahaar.in/2026/10/29/captain-smith-returned-from-the-jaws-of-death-twice-you-will-be-shocked-to-hear-what-the-doctors-revealed-following-his-skull-fracture/
चमोलीचे जिल्हाधिकारी गौरव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरचे लोकेशन मिळत नसून तातडीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. प्रशासनासह संबंधित हेलिकॉप्टर कंपनीचे पथकही हेलिकॉप्टरचा नेमका ठावठिकाणा घेत आहे.