Home क्रीडा IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव

0
IND vs NZ 4th T20: न्यूझीलंडने चौथ्या सामन्यात ऑकलंडचा इतिहास बदलला, भारताचा 87 धावांनी पराभव
(Photo: ANI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथ्या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला, पण सामना न्यूझीलंडने जिंकला. चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 7 गडी गमवून 259 धावा केल्या. तसेच विजयासाठी 260 दिल्या. या धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव गडगडला. भारतीय संघ या धावांचा पाठलाग करताना 172 धावा करू शकला. भारताने हा सामना 87 धावांनी गमावला आणि मालिकेत 3-1 अशी स्थिती झाली. खरं तर भारताची विजयी लय पाहता या मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश देईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. न्यूझीलंडने चौथ्या टी20 सामन्यात कमबॅक केलं आणि व्हाईटवॉशचं संकट टाळलं.

भारताचा डाव

न्यूझीलंडने विजयासाठी दिलेल्या 260 धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव पहिल्या षटकात गडबडला. पहिल्या जेकब डफीने भारतीय संघाला बॅकफूटवर ढकललं. संजू सॅमसन आणि इशान किशन यांना पहिल्याच षटकात तंबूत पाठवलं. संजू सॅमसन 4 धावांवर बाद झाला, तर इशान किशनला खातंही खोलता आलं नाही. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फार काळ मैदानात तग धरून खेळता आलं नाही. अभिषेक शर्मा 15 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. त्या पाठोपाठ श्रेयस अय्यरही 22 धावांवर बाद झाला. अक्षर पटेल 7, नितीश कुमार रेड्डी 21 धावांवर तंबूत परतले आणि भारताचा पराभव निश्चित झाला. नमन धीर आणि तिलक वर्माने 16 चेंडूत 32 धावा केल्या. पण ही जोडीही फार काळ टिकली नाही. नमन धीर 13 चेंडूत 28 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेला अर्शदीप सिंग पहिल्या चेंडूवर तंबूत परतला. तिलक वर्माचा डाव 35 धावांवर आटोपला. तर प्रिन्स यादव 18 आणि मयंक यादव 3 धावांवर नाबाद राहिले.

https://www.prahaar.in/2026/10/30/shreyas-iyer-has-set-the-record-for-winning-the-most-coin-tosses-since-taking-on-the-captaincy-in-t20-cricket/

ऑकलँडचा इतिहास बदलला

भारताने यापूर्वी ऑकलंडमध्ये तीन टी20 सामने खेळले होते. तिन्ही सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली होती. पण चौथ्या सामन्यात न्यूझीलंडला इतिहास बदलला. न्यूझीलंडने मालिकेतील आणि मैदानातील चौथ्या सामन्यात इतिहास बदलून टाकला. या मैदानात आता 3-1 अशी स्थिती झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here