भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी20 मालिका सुरू असून धडाधड विक्रम रचले गेले आहे. आतापर्यंत या मालिकेत फलंदाजांचा वरचष्मा राहिला आहे. यात अर्शदीप सिंगच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. (Photo: ANI)न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यात अर्शदीप सिंगने 4 षटकात 38 धावा देत 1 विकेट काढली. ही विकेट अर्शदीप सिंगच्या टी20 कारकिर्दीतील महत्त्वाची विकेट ठरली. कारण त्याने या विकेटसह 150 विकेट घेण्याचा विक्रम रचला आहे. (Photo: ANI)न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरकडेही 150 विकेट घेण्याची संधी आहे. पण त्याआधी हा पल्ला अर्शदीप सिंगने पूर्ण केला. अर्शदीप सिंगने 102 सामन्यात 150 विकेट पूर्ण केल्या आहेत. (Photo: ANI)अर्शदीप सिंगने या सामन्याच्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मिचेल सँटनर याची विकेट काढली. त्याची विकेट काढली आणि 150 विकेटचा पल्ला गाठला. (Photo: ANI)अर्शदीपने पदार्पणानंतर केवळ 1577 दिवसांत हा पराक्रम केला आहे. कोणत्याही गोलंदाजाने केलेला हा सर्वात जलद विक्रम असून त्याने हसरंगाचा 2325 दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे.(Photo: ANI)टी20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंमध्ये 150 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अर्शदीप सिंगने तिसरं स्थान गाठलं आहे. 2035 चेंडूत वानिंदू हसरंगा, 2098 चेंडूत रशीद खान, 2143 चेंडूत अर्शदीप सिंग आणि 2320 चेंडूत एहसान खानने हा पल्ला गाठला आहे. (Photo: ANI)