Home नाशिक कुंभमेळा Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी गोदावरी खळाळली ! गंगापूर धरणातून 300 क्युसेकने पाणी सोडले

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी गोदावरी खळाळली ! गंगापूर धरणातून 300 क्युसेकने पाणी सोडले

0
Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी गोदावरी खळाळली ! गंगापूर धरणातून 300 क्युसेकने पाणी सोडले

Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील गोदावरी नदीचे कोरडे पात्र पुन्हा प्रवाही झाले आहे. ३१ ऑक्टोबर रोजी रामकुंड येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

नाशिकमधील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे शनिवारी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचा ध्वजारोहण सोहळा पार पडणार आहे. नाशिकमधील कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्य मंत्री आणि आखाड्यांच्या महंतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/30/nashik-kumbhmela-a-grand-darshan-path-for-devotees-in-trimbakeshwar-development-projects-worth-275-crore-gain-momentum-plans-in-place-to-complete-the-first-phase-before-the-kumbh-mela/

दरम्यान, कुंभमेळ्याच्या तयारीसाठी रामकुंड परिसरात विविध विकासकामे सुरू असल्याने गोदावरीचे पात्र कोरडे ठेवण्यात आले होते. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रात्री १२.३० वाजता धरणातून ३०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here