रोहित शर्माने टी20 आणि कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली असून आता फक्त वनडे खेळत आहे. वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेत खेळण्याचं त्याचं लक्ष्य आहे. त्यामुळे वनडे मालिकेत निवड होण्यापासून चांगला खेळ दाखवण्याची रोहित शर्माची धडपड सुरू आहे. त्याचबरोबर फिटनेस राखणंही तितकं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे, रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप संघात ठेवायचं की नाही? यावरून निवड समितीत संभ्रम आहे. असं असताना रोहित शर्माचं विधान चर्चेत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी त्याने विधान केल्याने सोशल मीडियावर चर्चा होत आहे. कारण याच वर्षी रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करत शुभमन गिलकडे कर्णधारपद सोपवलं होतं. आता त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघ वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा खेळणार आहे.
रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल
रोहित शर्मा होस्ट करत असलेल्या फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा या कार्यक्रमात रोहित शर्माने हे विधान केलं आहे. या व्हिडीओत रोहित शर्मावर एका प्रश्नाचा मारा केला गेला. यात रोहित शर्माला विचारलं गेलं की, जर एखादी इमर्जेन्सी स्थिती आली तर कोणाला कॉल करणार? शुभमन गिल की श्रेयस अय्यर? यावर रोहित शर्मा म्हणाला की, ‘दोघंही कर्णधार आहेत. शुभमन गिल आता माझा कर्णधार आहे. 2027 वनडे वर्ल्डकप मला खेळायचा आहे. त्याला खूश ठेवावं लागेल.’
🗣️Shubhman or Iyer
“I choose Gill bcoz I have to play 2027 WC and Iyer for making comeback in T20I after 2027″😭
Rohit is not going anywhere till 2030 https://t.co/38U18aTj7I
— Shikha (@Shikha_003) October 26, 2026
https://www.prahaar.in/2026/10/29/drop-vaibhav-sooryavanshi-from-the-playing-11-for-the-ind-vs-nz-fourth-t20-match-why-did-r-ashwin-say-this/
रोहित शर्मा इतक्यावरच थांबला नाही. रोहितने मजेशीर अंदाजात सांगितलं की, ‘2027 नंतर टी20 क्रिकेटमध्ये कमबॅक करायचं आहे. तर श्रेयस अय्यरला खूश ठेवावं लागेल.’ खरं तर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने 2027 टी20 वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर त्याने या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. दरम्यान, वनडे वर्ल्डकप स्पर्धेत संघात जागा मिळावी यासाठी रोहित शर्माला कठीण परीक्षा द्यावी लागणार आहे. रोहित शर्मासाठी न्यूझीलंड दौरा हा महत्त्वाचा असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मासाठी या मालिकेत करो या मरोची स्थिती असणार आहे.