भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील सलग तीन सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभवाची धूळ चारली. यासह मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात घातली आहे. आता उर्वरित दोन सामने औपचारिक असणार असून भारतीय संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल. तर न्यूझीलंड या मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी उर्वरित दोन सामन्यात विजयासाठी जोर लावेल. असं असताना भारतीय संघ चौथा टी20 सामनाही खिशात घालेल, असं दिसत आहे. कारण चौथा टी20 सामना ऑकलँडमध्ये होत आहे. या ठिकाणी भारतीय जिंकण्याची हमी आहे. या ठिकाणी खेळलेल्या सामन्यात भारताने कधीच पराभवाचं तोंड पाहिलेलं नाही. त्यामुळे भारत टी20 मालिकेत 4-0 अशी आघाडी घेईल असा विश्वास आहे.
ईडन पार्कवर भारताला हमखास यश!
भारत न्यूझीलंड यांच्यातील चौथा टी20 सामना ऑकलँडच्या ईडन पार्कवर होणार आहे. 30 ऑक्टोबर 2026 रोजी हा सामना होईल. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यात ईडन पार्कवरील रेकॉर्ड पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे भारताला या मैदानात रोखणं न्यूझीलंडला कठीण जाणार आहे. या मैदानात पहिला टी20 सामना 2019 मध्ये खेळला होता. त्यानेतर 2020 मध्ये टी20 मालिकेतील दोन सामने या ठिकाणि गेले. या दोन्ही भारताने विजय मिळवला. या मैदानात भारताने 204 धावांचं लक्ष्य गाठलं होतं.
https://www.prahaar.in/2026/10/28/indw-vs-zimw-vaishnavi-sharma-wipes-out-half-the-zimbabwean-side-achieves-this-feat-for-the-first-time-in-her-cricket-career/
न्यूझीलंडची स्थिती नाजूक
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांना त्यांच्याच घरात पराभवाची धूळ चारली आहे. इतकंच काय तर तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने संघात बदलही केला होता. मात्र त्याचाही काही उपयोग झाला नाही. आता चौथा टी20 ऑकलँडमध्ये होणार असल्याने घाम फुटला आहे. या मैदानात न्यूझीलंड संघाने वेगवेगळ्या देशांसोबत एकूण 33 टी20 सामने खेळले आहेत. त्यात फक्त 13 सामन्यात विजय मिळाला आहे. तर 19 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तीन सामन्यांचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला होता.