Home ताज्या घडामोडी Indian Railway News: प्रवाशांनो, एक्स्प्रेसमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 मोबाइल चार्जिंग करता येणार नाही! नेमकं कारण काय?

Indian Railway News: प्रवाशांनो, एक्स्प्रेसमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 मोबाइल चार्जिंग करता येणार नाही! नेमकं कारण काय?

0
Indian Railway News: प्रवाशांनो, एक्स्प्रेसमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 मोबाइल चार्जिंग करता येणार नाही! नेमकं कारण काय?
एक्स्प्रेसमध्ये रात्री 11 ते पहाटे 5 मोबाइल चार्जिंग करता येणार नाही! फोटो सौजन्य: सोशल मीडिया

नवी दिल्ली: रेल्वेने जुने नियम पुन्हा आमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. लांबपल्ल्याच्या प्रवाशाला जाणाऱ्या प्रवाशांना ह्या नियमाचा सर्वात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेने लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बाबतीत काही मार्गदर्शक तत्त्वांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे बोर्डाने सर्व विभागातल्या लांबपल्ल्यांच्या ट्रेनमधील कोचमध्ये, रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मोबाईल चार्जिंग पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेमध्ये प्रवाशांना कोणत्याही प्रकारची सुट दिली जाणार नाही. रेल्वेने घेतलेल्या ह्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे प्रवाशांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/jaipur-crime-twenty-rupees-kachori-costs-twenty-lakh-rupees-theft-incident-revealed-in-cctv-video/

रात्रीच्या वेळी लांबपल्ल्याच्या ट्रेनमध्ये चार्जिंग पॉईंट बंद ठेवण्याचा निर्णय, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला आहे. दक्षिण पूर्व रेल्वे मार्गिकेवर एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाल्याची घटना घडली होती. मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी ट्रेनच्या डब्यातील मोबाईल चार्जिंग पॉईंट्स बंद नव्हते. या घटनेनंतर, रेल्वे बोर्डाने रात्रीच्या निर्धारित वेळेत चार्जिंग पॉईंट्स बंद ठेवण्याच्या सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. आगीची शक्यता आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज होण्यातील धोका टाळण्यासाठी रेल्वेने यापूर्वीच खबरदारीचे निर्णय घेतले आहेत.

चार्जिंग उपकरणांमधील बिघाड, बॅटरी जास्त गरम होणे किंवा विजेच्या समस्यांमुळे सुरक्षिततेचा धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे स्फोटाच्या घटना अधिक होतात. रेल्वे बोर्डाने संबंधित कर्मचाऱ्यांना, कोच चार्जिंग पॉईंट्स निर्धारित वेळेत बंद केले जातील याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रणालीबाबत सर्व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यावर, तसेच आवश्यक प्रशिक्षण आणि समुपदेशन देण्यावर भर देण्यात आला आहे. याशिवाय, सर्व मेल- एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये या आदेशाचे पालन होत आहे की नाही? ह्याचा तपास करण्यासाठी अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी अचानक तपासणी करून संबंधित नियमांचे पालन होत असल्याची खात्री करावी.

https://www.prahaar.in/2026/10/28/an-opportunity-to-secure-a-job-at-the-supreme-court-complete-details-on-eligibility-salary-and-the-application-process/

निष्काळजीपणा टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्याही निश्चित करण्यात आल्या आहेत. मुख्य गोष्ट म्हणजे, रेल्वेचा हा नवा नियम नसून रेल्वे बोर्डाचा 19 जून 2014 चाच जुना नियम आहे. हा नियम 12 वर्षांपूर्वी रेल्वेने नियम काढून निर्देश दिले होते. 25 ऑक्टोबर रोजी, ओडिशातील बंडामुंडा स्थानकाजवळ 12809 मुंबई- हावडा मेलमध्ये आगीची घटना घडली होती. एक्स्प्रेसच्या B-3 या एसी कोचमध्ये, एका प्रवाशाने पॉवर बँक चार्जिंगला लावली होती. चार्जिंगला लावलेल्या पॉवरबँकचा मध्यरात्री 3.38 वाजता स्फोट झाला. सुदैवाने घटनेमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. पण ही एक्स्प्रेस 15 मिनिटे थांबवण्यात आली होती, त्यानंतर सर्व गोष्टी तपासल्यानंतरच ही एक्स्प्रेस पुन्हा रवाना केली.

प्रवाशांनी प्रवासादरम्यान कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

रात्री रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वी आपला स्मार्टफोन आणि इतर आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणे चार्ज करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. रात्री 11 नंतर चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध असतील यावर अवलंबून राहू नका. जर पॉवर बँक किंवा मोबाईल फोन चार्जिंग डिव्हाइस नेहमीपेक्षा जास्त गरम झाले, त्यातून धूर निघत असेल किंवा जळल्याचा वास येत असेल, तर त्याचा वापर थांबवा आणि तात्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना कळवा. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, रात्रीच्या वेळी डब्यांमध्ये आग किंवा वि‍जेमुळे होणार्‍या अपघातांचा धोका कमी करणे हा रेल्वेचा उद्देश आहे. त्यामुळे, प्रवाशांनी सुरक्षा सूचनांचे पालन करत कोणत्याही संशयास्पद परिस्थितीकडे दुर्लक्ष न करणे महत्त्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here