Home ताज्या घडामोडी New FASTag Rules: वारंवार टोल भरण्याची कटकट संपणार! वाहनचालकांना वर्षभराच्या पासची सोय; कशी असेल सुविधा

New FASTag Rules: वारंवार टोल भरण्याची कटकट संपणार! वाहनचालकांना वर्षभराच्या पासची सोय; कशी असेल सुविधा

0
New FASTag Rules: वारंवार टोल भरण्याची कटकट संपणार! वाहनचालकांना वर्षभराच्या पासची सोय; कशी असेल सुविधा
वारंवार टोल भरण्याची कटकट संपणार! वाहनचालकांना वर्षभराच्या पासची सोय फोटो सौजन्य: ANI News

नवी दिल्ली: देशातील राष्ट्रीय महामार्गांवर कायम प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसंबंधित महत्त्वाची बातमी आहे. येत्या 1 नोव्हेंबरपासून वाहनचालकांसाठी FASTag संबंधित एक महत्त्वाचा बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून, राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझाच्या 20 किमीच्या परिसरामध्ये राहणार्‍या खाजगी वाहन मालकांसाठी सरकार सवलतीचा वार्षिक टोल पास सुरू करण्यात येणार आहे. नवीन नियमांनुसार, राष्ट्रीय महामार्ग टोल परिसरामध्ये राहणाऱ्या पात्र खाजगी वाहन मालकांना प्रत्येक प्रवासावर स्वतंत्र टोल शुल्क भरण्याऐवजी वार्षिक शुल्क भरून स्थानिक टोल पास मिळवण्याची सुविधा मिळणार आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/jio-platforms-ipo-listing-2026-a-historic-stock-market-debut-for-jio-platforms-the-ambani-family-is-overjoyed/

वाहनचालकांना या पाससाठी ₹1500 किंवा ₹3000 पर्यंत वार्षिक शुल्क भरावे लागणार आहे. टोल नाका महानगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीत आहे की बाहेर, यावर ही किंमत अवलंबून असेल. घरी, कामावर किंवा दैनंदिन गरजांसाठी वारंवार तोच टोल प्लाझा ओलांडणाऱ्या स्थानिक वाहनचालकांना दिलासा देणं, हा या मागचा मुख्य उद्देश आहे. ही सुविधा सर्व वाहनांना उपलब्ध नसेल. फास्टॅगची स्थिती आणि रस्त्यासंबंधित असलेल्या विशिष्ट अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे, त्यांनाच ही सुविधा उपलब्ध असणार आहे. सरकारने नवीन स्थानिक टोल पासधारकांसाठी, वाहन मालकाच्या गावाच्या किंवा शहराच्या नावावर नव्हे, तर टोल प्लाझाच्या प्रशासकीय हद्दीनुसार दोन वेगवेगळे वार्षिक शुल्क निश्चित केले आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/28/a-three-day-mahakumbh-grand-gathering-on-sanatan-culture-and-the-indian-knowledge-tradition-at-patanjali-university/

नगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीबाहेर असलेल्या टोल नाक्यावर ₹1500 ची योजना लागू आहे. जवळपासच्या टोल नाक्यावरून तुम्ही वार्षिक पास काढू शकणार आहेत. यासाठी दरमहा सरासरी ₹125 खर्च येईल. तर, महानगरपालिका किंवा स्थानिक शहराच्या हद्दीतील टोल नाक्यावर ₹3000 ची योजना लागू आहे. जवळपासच्या टोल नाक्यावरून तुम्ही वार्षिक पास काढू शकणार आहेत. सरासरी शुल्क प्रति महिना ₹250 आहे. दोन्ही शुल्क एक वर्षासाठी लागू आहेत. एकदा संबंधित टोल नाक्यासाठी हा पास जारी झाला. तर, तो इतर कोणत्याही टोल नाक्यावर तुम्हाला तो वापरता येणार नाही. दरम्यान, सध्या, पात्र व्यक्ती ₹360 चा मासिक पास खरेदी करू शकत आहे, ज्याची वार्षिक किंमत ₹4,320 आहे.

https://www.prahaar.in/2026/10/28/jio-listing-a-diwali-bonus-for-investors-heres-how-much-they-received-per-share/

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ज्या राष्ट्रीय महामार्गावर किंवा द्रुतगती मार्गावर ‘Closed User Fees Collection System’ नुसार शुल्क आकारले जाते, तेथे प्रवासासाठी कोणतेही सवलतीचे स्थानिक पास दिले जात नाहीत. प्रवाशांसाठी सेवा रस्ता किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध असला तरीही पास दिले जाणार नाहीत. मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 13 कोटींहून अधिक फास्टॅग जारी करण्यात आले आहेत. टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या पात्र लोकांसाठी प्रवास किफायतशीर करणे आणि त्यांची ये- जा सुलभ करणे, हा या नवीन तरतुदीचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here