Home ब्रेकिंग न्यूज महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

0
महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपये दिवाळी भेट; महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत एकूण २ हजार रुपयांची वाढ झाली मंजूर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने परस्पर निर्णय देत ३२ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेत याची थेट नोंद सॅपवर झाली होती. परंतु याबाबत तातडीने महापौरांना आणि अध्यक्षतेखाली गटनेत्यांची बैठक घेत हा निर्णय बदलला आणि कर्मचाऱ्यांना अजून एक हजाराची वाढ मिळवून दिली. त्यामुळे मागील दिवाळी ३१ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यात २ हजारांची वाढ देत ३३ हजार रुपये एवढी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला.

https://www.prahaar.in/2026/10/28/mumbaikars-for-the-next-seven-days-boil-and-filter-your-water-before-drinking-it/

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त सानुग्रह अनुदान देण्याची मागणी कामगार संघटनांनी मागील आठवड्यात केल्यानंतर मागील वर्षी दिलेल्या दिवाळी भेटीच्या रकमेत १ हजार रुपयांची वाढ सुचवत ३२ हजार रुपये एवढी रक्कम देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लोकप्रतिनिधी यांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर बुधवारी दुपारी गटनेत्यांची बैठक महापौर रितू तावडे यांनी बोलावली. या बैठकीत प्रशासनाने आणखी १ हजार रुपये वाढवून देण्यास संमती दिली. त्यामुळे अंतिमतः ३३ हजार रुपये एवढी रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

दीपावली – २०२६ करीता महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱयांना सानुग्रह अनुदान देण्याबाबतची बैठक आज (दिनांक २८ ऑक्टोबर २०२६) महापौर दालनात झाली. उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, सभागृहनेते गणेश खणकर, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी, एआयएमआयएम गटनेते विजय उबाळे, मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन अब्रहानी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर, सहआयुक्त (वित्त) देविदास क्षिरसागर, उप आयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी यांच्यासह महानगरपालिका कामगार तथा कर्मचारी संघटनांच्‍या समन्वय समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यानंतर माध्यमांशी बोलतांना महापौर रितू तावडे म्हणाल्या की, राज्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने निकषांनुसार राज्यातील ३०० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. राज्यातील या परिस्थितीचा सारासार विचार करून महानगरपालिकेतील गटनेते, पदाधिकारी, महानगरपालिका प्रशासन आणि कामगार-कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे दीपावली सानुग्रह अनुदान एकत्रितपणे अदा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दीपावलीसाठी महानगरपालिका अधिकारी / कर्मचाऱ्यांना आर्थिक वर्षानिहाय अदा केलेले सानुग्रह अनुदान/ भाऊबीज भेटीचे विवरण

  • आर्थिक वर्ष २०१९- २०२० : रुपये १५,५००/-
  • आर्थिक वर्ष २०२० -२०२१ : रुपये २०,०००/-
  • आर्थिक वर्ष २०२१ – २०२२ : रुपये २२,५००/-
  • आर्थिक वर्ष २०२२ – २०२३ : रुपये २६,०००/-
  • आर्थिक वर्ष २०२३ – २०२४ : रुपये २९,०००/-
  • आर्थिक वर्ष २०२४ – २०२५ : रुपये ३१,०००/-
  • आर्थिक वर्ष २०२५- २०२६ : रुपये ३३,०००/-*

कर्मचारी संख्‍येबाबत माहिती

  • महानगरपालिका नियमित वेतनश्रेणीतील पूर्णवेळ अधिकारी / कर्मचारीः ८३,२७४
  • अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारीः २,९९१
  • महानगरपालिका प्राथमिक शाळेतील तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवकः १,१४५
  • माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित / विनाअनुदानित): १,२९८
  • माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित / विनाअनुदानित): ३६
  • अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित / विनाअनुदानित): १२
  • एकूण – ८८, ७५६

  • सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (सी.एच.व्ही): (भाऊबीज भेट) – २,३९३
  • बालवाडी शिक्षिका / मदतनीस – (भाऊबीज भेट) – २,३६०
  • सानुग्रह अनुदान प्राप्त एकूण अधिकारी / कर्मचारी संख्‍या – ९३,५०९

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here