Home क्रीडा WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या

WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या

0
WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या
WPL 2027 Auction: वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेसाठी खेळाडूंवर आज लागणार बोली! फ्रेंचायझींकडे किती पैसे? जाणून घ्या (Photo: @wplt20 Twitter)

वुमन्स प्रीमियर लीग 2027 स्पर्धेसाठी केरळच्या कोच्चीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. या लिलाव प्रक्रियेसाठी एकूण 150 खेळाडूंची निवड झाली आहे. पण फ्रेंचायझींकडे एकूण 27 जागाच आहेत. त्यामुळे आता या जागा फ्रेंचायझी कशा भरतील? याकडे लक्ष लागून आहे. खेळाडूवर कोच्चीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये बुधवार (आज) संध्याकाळी 5.30 वाजता बोली लागणार आहे. या लिलाव प्रक्रियेत एकूण 122 भारतीय खेळाडू आहेत. तर 28 विदेशी खेळाडूंचा या लिलाव प्रक्रियेत सहभाग आहे. त्यामुळे 20 जागा भारतीय खेळाडूंसाठी, तर 7 जागा विदेशी खेळाडूंसाठी असणार आहेत. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत पाच फ्रेंचायझींमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. पण फ्रेंचायझींकडे एकूण किती रक्कम आहे आणि किती बोली लावू शकतात याची उत्सुकता आहे.

फ्रेंचायझींकडे बोली लावण्यासाठी किती पैसे?

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत एकूण 5 फ्रेंचायझी आहे. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, युपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या फ्रेंचायझी आहे. युपी वॉरियर्सकडे या लिलावात खर्च करण्यासाठी सर्वाधिक रक्कम आहे. यूपी वॉरियर्सच्या खात्यात 3.75 कोटी रुपये आहेत. त्यामुळे खेळाडूंच्या खरेदीसाठी बिनधास्त बोली लावू शकतात. यात गुजरात जायंट्सकडे सर्वाधिक 1.25 कोटी रुपये आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे 1.15 कोटी, दिल्ली कॅपिटल्सकडे 1.10 कोटी, तर मुंबई इंडियन्सकडे 90 लाख रुपये आहेत. या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सकडून अमेरिकेची डावखुरी वेगवान गोलंदाज तारा नॉरिसला ट्रेड केलं आहे.

कोणत्या संघाकडे किती जागा उपलब्ध आहेत?

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: जागा – 5, विदेशी खेळाडू – 2
  • मुंबई इंडियन्स: जागा – 7, विदेशी खेळाडू – 1
  • दिल्ली कॅपिटल्स: जागा – 5, परदेशी खेळाडू – 1
  • यूपी वॉरियर्स: जागा – 7, परदेशी खेळाडू – 2
  • गुजरात जायंट्स: जागा – 3, परदेशी खेळाडू – 1

https://www.prahaar.in/2026/10/27/where-did-they-lose-the-third-t20-match-against-india-new-zealand-captain-mitchell-santner-said/

महागडे खेळाडू आणि बेस प्राईस

लिलावासाठी सर्वोच्च बेस प्राईस 50 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 40 लाख, 30 लाख, 20 लाख आणि 10 लाख अशी बेस प्राईस विभागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च बेस प्राईसच्या गटात केवळ दोन खेळाडू आहेत.इंग्लंडच्या सोफिया डंकले आणि ऑस्ट्रेलियाच्या सोफी मोलिनक्सने 50 लाखांच्या सर्वाधिक बेस प्राईससह नोंदणी केली आहे.

तुम्ही WPL 2027 लिलाव कुठे पाहू शकता?

वुमन्स प्रीमियर लीग 2027 लिलावाचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाईल, तर त्याचे थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) JioHotstar वर उपलब्ध असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here