नाशिक : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे आज, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी नाशिक येथील पोलीस परेड ग्राउंड हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हेही त्यांच्यासोबत उपस्थित होते.
राज्यपालांच्या आगमनप्रसंगी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके-आहेर, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय ऐनापुरे, पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते.
https://www.prahaar.in/2026/10/28/warning-of-unseasonal-rain-in-maharashtra-once-again-possibility-of-stormy-winds-in-several-districts/
याशिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकट गीते, अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी अर्पिता ठुबे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे आणि तहसीलदार पंकज पवार यांचीही यावेळी उपस्थिती होती.