Home एक्सक्ल्युजिव्ह भारताने तिसऱ्या सामन्यानंतरच न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं

भारताने तिसऱ्या सामन्यानंतरच न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं

0
भारताने तिसऱ्या सामन्यानंतरच न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकली, अभिषेक शर्माचं वादळ घोंघावलं
फोटो सौजन्य: ANI News

न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 टीम इंडियाने 3-0 ने आघाडी घेतली आणि मालिका खिशात घातली. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 20 षटकात 3 गडी गमवून 198 धावा केल्या होत्या. तसेच विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान भारताने सहज गाठलं. भारताने 13.2 षटकात दिलेलं लक्ष्य 4 गडी गमवून पूर्ण केलं. भारताने निम्म्याहून अधिक धावा तर पॉवर प्लेमध्येच गाठल्या होत्या. भारताने पॉवर प्लेमध्ये एकही गडी न गमावता 118 धावा केल्या होत्या. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी मैदानात असताना अशीच अपेक्षा होती. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 7.1 षटकात 133 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे भारताचा विजय जवळपास निश्चित झाला. कारण या दोघांच्या आक्रमक खेळीमुळे विजयी धावांची गतीही कमी झाली होती. त्यामुळे भारताचा विजय पॉवरप्लेमध्ये निश्चित झाला होता. अभिषेक शर्माने 38 चेंडूत 113 धावा केल्या आणि बाद झाला. खरं तर त्याच्या झुंजार खेळीमुळे भारताचा विजय निश्चित झाला होता.

भारताचा डाव

अभिषेक शर्मा आणि वैभवू सूर्यवंशी यांनी पहिल्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. या जोडीने 43 चेंडूत 133 धावा केल्या. यात अभिषेक शर्माने 25 चेंडूत 80 आणि वैभव सूर्यवंशीने 19 चेंडूत 45 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनने दुसऱ्या विकेटसाठी 17 चेंडूत 45 धावांची भागीदारी केली. या भागीदारीनंतर विजय निश्चित झाला होता. कर्णधार श्रेयस अय्यर या सामन्यात काही खास करू शकला नाही. श्रेयस अय्यर 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. विजयासाठी 4 धावांची गरज असताना संजू सॅमसनही 13 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या नमन धीरने विजयी चौकार मारला आणि विजय मिळवून दिला.

https://www.prahaar.in/2026/10/27/ind-vs-nz-3rd-t20-abhishek-sharma-makes-new-zealand-bowlers-sweat-smashes-a-blistering-century-off-just-35-balls/

न्यूझीलंडचा डाव

न्यूझीलंडकडून टिम सैफर्ट आणि फिन एलन ही जोडी मैदानात आली होती. संघाच्या 4 धावा असताना टिम सैफर्ट 2 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर फिन एलन आणि डॅरेल मिचेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी केली. टिम सैफर्ट 40 धावांवर असातना बाद झाला. त्यानंतर आलेल्या ग्लेन फिलिप्स काही खास करू शकला नाही. त्याचा 17 धावांवर आटोपला. चौथ्या विकेटसाठी डॅरेल मिचेल आणि बेवॉन जेकब या जोडीने नाबाद 75 धावांची खेळी केली. ग्लेन फिलिप्स नाबाद 89, तर बेवॉन जेकब नाबाद 39 धावांवर राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here