Home क्रीडा IND vs NZ, 3rd T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, श्रेयस अय्यर गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

IND vs NZ, 3rd T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, श्रेयस अय्यर गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..

0
IND vs NZ, 3rd T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, श्रेयस अय्यर गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला..
IND vs NZ, 3rd T20: नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने, श्रेयस अय्यर गोलंदाजी घेत प्लेइंग 11 बाबत म्हणाला.. (Photo: BCCI Twitter)

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा भारताच्या बाजूने लागला. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने क्षणाचाही विलंब न करता प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. मागच्या दोन्ही सामन्यात भारताने विजयी धावांचा पाठलाग केला होता. आता तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ तसंच करणार आहे. भारताची मागच्या दोन सामन्यातील कामगिरी पाहता भारतीय संघ सहज विजयी लक्ष्य गाठेल असंच दिसत आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही गोलंदाजी करणार आहोत. काही बाबींमध्ये आम्हाला निश्चितपणे सुधारणा करत राहण्याची गरज आहे. मैदानाचे आकारमान आणि परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे आम्ही जेवढ्या लवकर जुळवून घेऊ, तेवढे आमच्यासाठी चांगले. जेव्हा खेळाडू सुरुवातीच्या संघात नसतात, तेव्हा ते समजून घेण्याइतके बरेच खेळाडू परिपक्व असतात. आमचा संघ तोच ​​असणार आहे.’

काय म्हणाला मिचेल सँटनर?

भारताने प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. पण न्यूझीलंडने मागच्या दोन सामन्यातील पराभवातून धडा घेत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. मिचेल सँटनर म्हणाला की, ‘ही आणखी एक चांगली खेळपट्टी दिसतेय, चेंडूला थोडा वेग आणि उसळी आहे. वारा नाहीये, ही एक चांगली गोष्ट आहे. आम्ही जिथून आलो आहोत, त्यापेक्षा खेळपट्टीचे आकारमान थोडे वेगळे आहे. आम्हाला माहित आहे की भारत एक महान संघ आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा वेग कमी करू शकत नाही. तीन बदल संघात केले आहेत. मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन आणि नॅथन स्मिथ बाहेर गेले आहेत. तर मॅथ्यू फिशर , काईल जेमिसन आणि ॲडम मिल्ने यांचा संघात समावेश झाला आहे.’

https://www.prahaar.in/2026/10/26/wtc-2027-the-result-of-the-third-test-match-between-australia-and-south-africa-is-crucial-for-new-zealand-here-is-how-it-will-impact-india/

दोन्ही संघांची प्लेइंग 11

न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन): टिम सेफर्ट (विकेटकीपर), फिन ऍलन, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), काईल जेमिसन, ऍडम मिल्ने, जेकब डफी, मॅथ्यू फिशर.

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here