




“मार्च ते नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या लढ्याला अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळावा, महाविद्यालयातील गैरव्यवस्थेला पूर्णविराम मिळावा आणि विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, यासाठी विद्यार्थी परिषद सातत्याने संघर्ष करत राहील. प्रशासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण व्हावे, हीच आमची अपेक्षा आहे.