Home ब्रेकिंग न्यूज खर्गेंचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य हे काँग्रेसच्या सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन – मंत्री नितेश राणे यांची टीका

खर्गेंचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य हे काँग्रेसच्या सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन – मंत्री नितेश राणे यांची टीका

0
खर्गेंचे पंतप्रधानांबद्दलचे वक्तव्य हे काँग्रेसच्या सडक्या मानसिकतेचे प्रदर्शन – मंत्री नितेश राणे यांची टीका

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांबद्दल काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या सडलेल्या मानसिकतेचे प्रदर्शन आहे. पंतप्रधानांच्या आई-वडिलांचा सन्मान राखू न शकणारे लोक देशाचे नेतृत्व करण्याचा विचार तरी कसा करू शकतात, असा सवाल राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी केला. काँग्रेस किती रसातळाला गेली आहे, हे या वक्तव्यातून दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली.

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या वक्तव्याविषयी माध्यमांनी विचारले असता मंत्री राणे म्हणाले, “पंतप्रधानांच्या कधी आईवर, तर कधी त्यांच्या वडिलांवर टीका केली जाते. ही काँग्रेसची खरी ओळख आहे. काँग्रेस कोणत्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करू शकते, हे यातून दिसते. जे पंतप्रधानांच्या आई-वडिलांचा सन्मान ठेवू शकत नाहीत, ते देशाचे नेतृत्व करण्याचा विचार तरी कसा करू शकतात? आपला देश सनातन हिंदू धर्माला मानणारा आहे. हिंदू राष्ट्र आहे. आई-वडिलांना मान-सन्मान देणे हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे. हे काँग्रेसजन औरंगजेबाची पिलावळ आहेत. जसे औरंगजेबाने आपल्या आई-वडिलांना सोडले नाही, रक्ताच्या नात्यांना सोडले नाही, तसेच औरंगजेबाच्या विचारांमध्ये आणि काँग्रेसच्या विचारांमध्ये काही फरक नाही,” असा हल्लाबोल राणे यांनी केला.

https://www.prahaar.in/2026/10/26/examination-fees-waived-for-10th-and-12th-grade-students-in-305-drought-affected-talukas/

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या कथित ऑडिओ क्लीपशी संबंधित ५०० कोटी रुपयांच्या प्रकरणावरून उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र दिल्याबाबतही राणे यांना विचारण्यात आले. त्यावर या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी नेमण्यात आली असून, एकदा चौकशीचा अहवाल आल्यानंतर आपण पुढचे बोलू, अशी भूमिका राणे यांनी मांडली.

मत्स्यव्यवसायाला आर्थिक बळ देण्यासाठी सहकारी बँकांची मदत

दरम्यान, किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसायाला चालना देणे, उत्पादन वाढविणे आणि मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सहकारी बँका आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, राज्य सहकारी बँक, नाबार्डचे प्रमुख अधिकारी आणि कोकणातील अन्य सहकारी बँकांना एकत्र आणून मत्स्यव्यवसायाच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. शासनदरबारी असलेल्या त्रुटी दूर करणे, मत्स्यउत्पादन वाढविणे आणि मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील, यावर विचारविनिमय करण्यात आला. आपण मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिलेला आहे; पण पुढचे पाऊल कसे टाकता येईल, यावरही चर्चा केली. विद्याधर अनास्कर यांच्यासारखे तज्ज्ञ आणि नाबार्डचे प्रमुख राहिलेले अधिकारी यांच्यासह सर्वांना एकत्र बसवून मच्छीमारांच्या आर्थिक उन्नतीसाठी चर्चेचे व्यासपीठ तयार केले आहे, असे राणे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here