Home ब्रेकिंग न्यूज मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ – मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ – मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश

0
मनोज जरांगेंच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लीप प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ – मुख्यमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना आदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (फोटो सौजन्य: @CMOMaharashtra X)

मुंबई : मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपमध्ये ५०० कोटी रुपयांचा उल्लेख असल्याने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या क्लीपमधील आवाज नेमका कोणाचा आहे, तसेच त्यातील आरोपांमध्ये तथ्य आहे का, याची तपासणी या माध्यमातून केली जाणार आहे.

मनोज जरांगे यांनी समोर आणलेल्या कथित ऑडिओ क्लीपमुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या क्लीपमध्ये ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

https://www.prahaar.in/2026/10/26/11th-accused-arrested-in-tiger-shroff-attack-case-remanded-in-police-custody-till-october-31/

शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणावरून भाजपवर टीका केली. दुसरीकडे, या कथित ऑडिओ क्लीपशी भाजपचा संबंध नसल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच, ही क्लीप कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) माध्यमातून तयार केली असण्याची शक्यता व्यक्त करून तिची सत्यता तपासण्याची मागणीही करण्यात आली.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली होती. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदनही दिले होते. त्यानंतर आता एसआयटी स्थापन करून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासात कथित ऑडिओ क्लीपची सत्यता, त्यातील आवाजाची ओळख आणि करण्यात आलेल्या आरोपांची वस्तुस्थिती तपासली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीतून नेमकी कोणती माहिती समोर येते आणि त्याचे राज्यातील राजकीय घडामोडींवर काय परिणाम होतात, याकडे लक्ष लागले आहे.

एसआयटीच्या माध्यमातून क्लिपची न्यायवैज्ञानिक तपासणी आणि इतर अनुषंगिक तांत्रिक तपासणी, तसेच या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी केली जाईल. मुंबई पोलिसांच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी स्थापन करण्यात आली असून पोलीस उप आयुक्त विजयकांत सागर, बजरंग बनसोडे या एसआयटीचे सदस्य असतील असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here