Home नाशिक कुंभमेळा Sinhastha Kumbhmela: जिवंतपणी स्वतःचे पिंडदान! जाणून घ्या नागा साधू बनण्यामागची कठोर तपश्चर्या आणि नियम

Sinhastha Kumbhmela: जिवंतपणी स्वतःचे पिंडदान! जाणून घ्या नागा साधू बनण्यामागची कठोर तपश्चर्या आणि नियम

0
Sinhastha Kumbhmela: जिवंतपणी स्वतःचे पिंडदान! जाणून घ्या नागा साधू बनण्यामागची कठोर तपश्चर्या आणि नियम
Sinhastha Kumbhmela: जिवंतपणी स्वतःचे पिंडदान! जाणून घ्या नागा साधू बनण्यामागची कठोर तपश्चर्या आणि नियम (Photo: ANI)

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 रोजी होणाऱ्या ध्वजारोहणानंतर सुरूवात होणार आहे. जवळपास दोन वर्षे हा कुंभमेळा असणार आहे. नाशिकच्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त येथे कुंभमेळा भरणार आहे. शैव आणि वैष्णव आखाड्यांचा मेळा या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. कुंभमेळ्यात नागा साधुंना मानाचं स्थान आहे. तसेच जगभरातील लोकांना या नागा साधुंचं आश्चर्य वाटतं. कारण त्यांचं राहणीमान आणि खानपान कायम चर्चेचा विषय ठरला आहे. असं असताना नाशिकच्या कुंभमेळ्यातही नागा साधुंचं खास आकर्षण असेल. चला जाणून घेऊयात नागा साधु आहेत तरी कोण? नागा साधु होतात तरी कसे? याबाबतची नियमावली काय? सर्वकाही जाणून घेऊयात..

असे होतात नागा साधु!

एखादी व्यक्ती नागा साधु होण्यासाठी आखाड्याकडे आपली इच्छा व्यक्त करते. त्यानंतर आखाडा समिती त्या व्यक्तीबाबत माहिती गोळा करते. सदर व्यक्ती नागा साधु होण्याच्या लायक आहे की नाही? याची शहनिशा केली जाते. सदर व्यक्तीच्या जीवनाबाबत सर्व माहिती गोळा केल्यानंतर आखाडा समिती त्याला सहभागी करून घेते. पण नुसतं सहभागी केलं की नागा साधु होतो, असं नाही. त्यासाठी कठीण परीक्षेतून जावं लागतं. 12 वर्षे कठीण तपस्या करावी लागते. त्या व्यक्तीला सांसारिक जीवनाचा त्याग करावा लागतो. या दरम्यान ब्रह्मचर्येचं पालन करावं लागतं. या परीक्षेनंतर पंच देवांकडून दीक्षा प्राप्त करावी लागते. पंच देव म्हणजेच शिव, विष्णु, शक्ती, सूर्य आणि गणेश..इतकंच काय तर स्वत:चं पिंडदान करावं लागत. म्हणजे जिवंतपणी मृत झालो म्हणून पिंडदान केलं जातं. भिक्षा मागून मिळालेलं अन्नच ग्रहण करावं लागतं.त्यातही जर भिक्षा मिळाली नाही तर उपाशी राहावं लागतं. कारण त्याला दिवसाला फक्त सात घरातून भिक्षा मागण्याची परवानगी आहे. त्यात दिवसातून फक्त एकदाच अन्नग्रहण करू शकतात.

https://www.prahaar.in/2026/10/23/how-many-akhadas-are-there-in-the-kumbh-mela-what-makes-them-unique-find-out-everything-with-just-one-click/

नागा साधु होण्याची पहिली सहा वर्षे महत्त्वाची असतात. या काळात नागा साधु फक्त लंगोट परिधान करतात. कुंभ मेळ्यात दीक्षा घेतल्यानंतर लंगोटचाही त्याग करतात. नागा साधु झाल्यानंतर आयुष्यभर निवस्त्र राहावं लागतं. कारण वस्त्र हे सांसारिक जीवनाचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे नागा साधु त्यानंतर वस्त्र वापरत नाही. तसेच शरीर झाकण्यासाठी भस्माचा वापर करतात. इतकंच काय तर नागा साधु त्यांच्या उर्वरित आयुष्यात कोणासमोरही वाकत नाहीत आणि निंदाही करत नाहीत. नागा साधु फक्त मोठ्या संन्याशी साधुंपुढेच नतमस्तक होतात. या सर्व नियमांचं पालन करणाऱ्या साधुला नागा साधु संबोधलं जातं. नागा साधु कधीच बेडवर झोपत नाही. नागा साधुंना सनातन धर्माचे रक्षक मानलं जातं. नागा साधु युद्धकलेत पारंगत असतात.

कुंभमेळ्यानंतर नागा साधु जातात कुठे?

कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधु जातात तरी कुठे? हा प्रश्न अनेकांना पडतो. कारण हजारोंच्या संख्येने आलेले नागा साधु अचानक गायब होतात. तसेच क्वचितच दिसतात. कुंभमेळा संपल्यानंतर नागा साधू आपल्या आखांड्यामध्ये परत जातात. तिथे ध्यानसाधना करतात आणि तपस्वी जीवन जगतात. काही नागा साधू हिमालयात किंवा जंगलात स्थलांतर कतारत. तेथील फळं आणि फुलांवर जगतात. काही नागा साधू हे प्रयागराज, नाशिक, हरिद्वाग आणि उज्जैनसारख्या प्रमुख तीर्थक्षेत्रांवर राहतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here