Home एक्सक्ल्युजिव्ह INDW vs ZIMW: मंधाना ब्रिगेडचा झिम्बाब्वेला दणका; टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही नावावर, दुसऱ्या सामन्यात असं घडलं..

INDW vs ZIMW: मंधाना ब्रिगेडचा झिम्बाब्वेला दणका; टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही नावावर, दुसऱ्या सामन्यात असं घडलं..

0
INDW vs ZIMW: मंधाना ब्रिगेडचा झिम्बाब्वेला दणका; टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही नावावर, दुसऱ्या सामन्यात असं घडलं..
INDW vs ZIMW: मंधाना ब्रिगेडचा झिम्बाब्वेला दणका; टी 20 पाठोपाठ वनडे मालिकाही नावावर, दुसऱ्या सामन्यात असं घडलं.. (Photo: BCCI Women Twitter)

भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार स्मृती मंधानाने प्रथम फलंदाजी निवडली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी गमवून 328 धावा केल्या आणि विजयासाठी 329 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान काही झिम्बाब्बे संघाला गाठता आलं नाही. झिम्बाब्वेचा संघ 207 धावांपर्यंत मजल मारू शकला. भारताने हा सामना 121 धावांनी जिंकला. भारताने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकून मालिकाही खिशात घातली आहे. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना हा औपचारिक असणार आहे. टी20 नंतर वनडे मालिकेतही क्लिन स्विप देण्याची संधी भारतीय क्रिकेट संघाकडे आहे. स्मृती मंधानाने नेतृत्व हाती घेतल्यानंतर टी20नंतर पहिला वनडे मालिका विजय आहे.

झिम्बाब्वेचा डाव

भारताने विजयासाठी दिलेल्या 329 धावांचा पाठलाग करताना लॉरीन फिरी 6 धावा करून बाद झाली. त्यानंतर झिम्बाब्वेच्या मॉडेस्टर मुपाचिकवा आणि चिपो मुगेरी तिरिपानो यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली. पण या दोघांची विकेट पडली आणि डाव गडगडला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने विकेट पडत गेल्या आणि धावगती वाढत गेली. प्रत्येक चेंडूवर सामना झिम्बाब्वेच्या हातून निसटत गेला. मॉडेस्टर मुपाचिकवा 49, चिपो मुगेरी-तिरिपानो 46, प्रिय बिझा 34, जोसेफिन न्कोमो 20, मिशेल मावुंगा 3, न्याशा ग्वांझुरा 20, नोमवेलो सिबांडा 0, टेंडाई माकुशा 0, चिएद्झा धुरुरु 12 धावा करून बाद झाले. भारताकडून वैष्णवी शर्मान 10 षटकात 39 धावा देत 4 विकेट काढल्या.

https://www.prahaar.in/2026/10/25/india-a-vs-new-zealand-a-test-padikkal-sudharsan-unbeaten-kiwis-still-hold-the-lead/

भारताचा डाव

दुसऱ्या वनडे सामन्यात भारताची सुरूवात काही खास झाली नाही. कर्णधार स्मृती मंधाना पहिल्याच षटकात एकही धाव न करता बाद झाली. त्यानंतर आलेली शफाली वर्माही स्वस्तात बाद झाली. तिला फक्त 8 धावा करता आल्या. पण त्यानंतर प्रतिका रावल आणि हरमनप्रीत कौरची जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 124 धावांची भागीदारी केली. प्रतिका रावल 61 धावांवर असताना बाद झाली. त्यानंतर आलेली तेजल हसबनीसही फक्त 3 धावा करून तंबूत परतली. असं असताना हरमनप्रीत कौर आणि दीप्ति शर्मा जोडीने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या जोडीने पाचव्या विकेटसाठी 137 चेंडूत 153 धावांची भागीदारी केली. हरमनप्रीत कौरने 121 चेंडूत 15 चौकारांच्या मदतीने 126 धावा केल्या. तर दीप्ति शर्माने 86 चेंडूत 15 चौकार मारत नाबाद 106 धावांची खेळी केली. ऋचा घोष 7 धावा करून बाद झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here