Home ब्रेकिंग न्यूज BMC News : मुंबई बाहेर सर्व आरएमसी प्लांट न्या, वाढत्या प्रदुषणामुळे महापौरांनी दिले प्रशासनाला निर्देश

BMC News : मुंबई बाहेर सर्व आरएमसी प्लांट न्या, वाढत्या प्रदुषणामुळे महापौरांनी दिले प्रशासनाला निर्देश

0
BMC News : मुंबई बाहेर सर्व आरएमसी प्लांट न्या, वाढत्या प्रदुषणामुळे महापौरांनी दिले प्रशासनाला निर्देश
मुंबई बाहेर सर्व आरएमसी प्लांट न्या, वाढत्या प्रदुषणामुळे महापौरांनी दिले प्रशासनाला निर्देश (Photo AI)

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबाबत महापालिका सभागृहात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यावर सर्वच सदस्यांची प्रशासनाला सूचना करत योग्यप्रकारे काळजी घेण्याचे सूचना केल्या. त्यावर महापौर रितू तावडे यांनी मुंबईतील सर्व आरएमसी प्लांट मुंबई बाहेर नेण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मात्र, याबाबत मुंबईतील सर्व आरएमसी प्लंट बंदिस्त असून त्यावर कारवाई करण्याची गरज नाही, तरीही अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन सुरु असल्याचे दिसून आल्यास त्यावर कारवाई करू असे आश्वासन अतिरिक्त् आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिली.

मुंबईतील वाढत्या वायू आणि धुळ प्रदुषणाबाबत विरोध पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी चिंता व्यक्त करत धुळ आणि विषारी वायूच्या विळख्यात जनता अडकली असल्याचे सांगितले. मुंबई हायकोर्टान मुंबईच्या प्रदुषणावर अत्यंत तीव्र शब्दांत ताशेरे ओढत सरकारला जाब विचारला आहे. न्यायालयाच्या आदेशांचा अवमान करणाऱ्या जबाबदाऱ्या महापालिका आणि प्रदुषण् नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब कोण विचारणार असा सवाल करत वाढता संसर्गजन्य आजार आणि जुन्या भंगार गाडयांबाबतही कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावर बोलताना अश्रफ आझमी यांनी प्रदुषणात मुंबईत तिसऱ्या क्रमांकावर आली असल्याचे सांगत झाडे कापली जात असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तर मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी बांधकामाच्या ठिकाणी काळजी घेण्यासाठी २८ मुद्दयांची नियमावली आहे पण त्याचे पालन होते का याची तपासणी कुणीच करत नाही असे सांगितले.

शिवसेनेचे अमेय घाेले यांनी बांधकामांच्या ठिकाणी हवेचा निर्देशांक दर्शवणारे फलक चुकीचे असतात, त्यांतील नोंद बोगस असल्याचे सांगितले. तर भाजपचे शीतल गंभीर यांनीही एक्यूआय नियंत्रणात ठेवण्याबाबत बांधकाम व्यावसायिक नियमांचे पालन करत नाही अशी नाराजी व्यक्त केली.

https://www.prahaar.in/2026/10/24/is-trai-preparing-for-a-major-change-regarding-otps-you-might-soon-have-to-open-your-messaging-app-to-view-the-code/

रस्ते बांधकामातील डेब्रीज कुठे टाकले जाते असा सवाल करत एमआयएमचे विजय उबाळे यांनी केली. तर डॉ सईदा खान यांनी मियावकी उद्याने किती बनवली आणि किती बांधकामांची तपासणी करून कारवाई केली याची आकडेवारी मागवली. अंकित प्रभू यांनी महापालिकेने एक्यूआयचे मापन करणारे स्वत:चे रडार बसवावे अशी मागणी केली. तर भाजपचे प्रतिक कर्पे यांनी अंकित प्रभू यांच्या आदित्य ठाकरे यांच्यामुळे वातावरण कृती आराखडा बनवला जात असल्याचे सांगितले. याचा समाचार घेत हे एक्यूआय मॉनिटरींग का बसवले? हवेची नोंद घेण्यासाठी की बांधकाम व्यावसायिकांना टार्गेट करण्यासाठी असा सवाल केला. प्रिती सातम यांनी मुंबईतील सन २०२३ पासूनची समधानकारक दिवसांची जंत्रीच मांडत मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना तसेच नियमभंग करणाऱ्यांवर कठोर अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने ‘वायू प्रदूषण नियंत्रण व अंमलबजावणी कृती आराखडा-२०२६’ तयार केला असल्याचे सांगत प्रशासन चांगल्या प्रदुषण नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

गणेश खणकर यांनी बांधकामांच्या ठिकाणी नियमांचे पालन होते किंवा नाही याची तपासणी करा म्हणजे ५० टक्के प्रदुषणाची समस्या कमी होईल असे सांगितले. तर झाडे कापली नसतील कोस्टल रोड बनता नसता, मेट्रो रेल्वे धावली नसती. पण याचा आज चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत कॅरन डिमेलो, दिपक कोतेकर, यामिनी जाधव, श्रध्दा जाधव, लिना देहेरकर. साबे, सचिन पडवळ, अर्चना भालेराव, तुलिफ मिरांडा, स्वप्ना म्हात्रे जमीर कुरेशी,आदींनी चर्चेत भाग घेतला.

तर यावेळी महापौर रितू तावडे यांनी मुंबईत महापौर म्हणून ८ हजार लोकांकडून तक्रारींची पत्र प्राप्त झाली आहे. यामध्ये अनधिकृत बांधकाम आणि धुळीच्या समस्यांबाबत पत्र असते. त्यामुळे राईट टू ब्रीथ हा श्वास घेण्याचा अधिकार आहे, आणि तो नसेल तर ते चुकीचा आहे. एक्यूआय नियंत्रणात राखण्यासाठी आरएमसी प्लांट प्रथम शहरातून काढून टाका, मुंबई बाहेर न्या, त्यामुळे तो धुळीने माखलेला आहे,असे सांगत यावर तातडीने निर्णय घ्यावा असे सांगितले.

एक्यूआय मॉनिटरींगसाठी पाच ठिकाणी नियंत्रण केंद्र

मुंबईमध्ये हवा निर्देशांक मोजण्यासाठी एकूण २९ मशिन्स बसवण्यात आले आहेत. आता यासाठी ५ ठिकाणी नियंत्रण केंद्र उभारली जात आहे. त्यातील ३ केंद्र उभारण्यासाठीची जागा निश्चित होवून कामाला सुरुवात झाली आहे तर दोन ठिकाणी जागेचा शोध सुरु आहे. आरएमसी प्लांट यामध्ये एमपीसीबीला कारवाई करण्याचा अधिकार आहे, आणि त्यानुसार ते प्रकल्प त्यांनी कव्हर केलेली आहेत. त्यावर कारवाई करण्याचा अधिकार महापालिकेला नाही, परंतु महापालिका एमआरटीपी अंतर्गत करून कारवाई शकते. राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनीही नियमांचे पालन न करणाऱ्या आरएमसी प्लांट कडक नियम करा, वाहतूक पोलिसांनाही गाड्या तपासण्याचे निर्देश दिले आहेत. तरीही आरएमसी प्लांटबाबत नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आल्यास एमपीसीबीच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here