Home महाराष्ट्र नाशिक ST Bus News: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांत अस्वच्छता आढळल्यास थेट कारवाई; मंत्री प्रताप सरनाईकांचा अधिकार्‍यांना इशारा

ST Bus News: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांत अस्वच्छता आढळल्यास थेट कारवाई; मंत्री प्रताप सरनाईकांचा अधिकार्‍यांना इशारा

0
ST Bus News: एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांत अस्वच्छता आढळल्यास थेट कारवाई; मंत्री प्रताप सरनाईकांचा अधिकार्‍यांना इशारा
एसटी स्थानकांवरील प्रसाधनगृहांत अस्वच्छता आढळल्यास थेट कारवाई फोटो सौजन्य: प्रहार न्यूज

मुंबई: एसटी बस स्थानकांवरील अनेकदा स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील बस स्थानकांवर प्रसाधन गृहे अस्वच्छ आढळल्यास राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ह्या कारवाईसाठी संबंधित विभाग नियंत्रक जबाबदार असेल. इतकंच नाही तर, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याची माहितीही परिवहन मंत्र्यांनी दिली आहे.

https://www.prahaar.in/2026/10/23/how-many-akhadas-are-there-in-the-kumbh-mela-what-makes-them-unique-find-out-everything-with-just-one-click/

एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता ठेवण्यासाठी हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. प्रवाशांना स्वच्छ, निरोगी आणि आरोग्यदायी प्रसाधनगृहे उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची मूलभूत जबाबदारी असून, त्यात कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. एसटी महामंडळाच्या मुख्यालयात आयोजित स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला महामंडळाचे सर्व विभागप्रमुख, प्रादेशिक व्यवस्थापक आणि विभाग नियंत्रक उपस्थित होते.

https://www.prahaar.in/2026/10/23/nashik-momentum-for-nashiks-ramkal-path-project-approval-granted-for-an-expenditure-of-12-crore-for-the-development-of-the-kalaram-kapaleshwar-temple-precinct/

“सर्वसामान्य प्रवाशांकडून आपण दोन रुपये स्वच्छता अधिभार आकारतो. प्रवासीही ही रक्कम देण्यास हरकत घेत नाहीत. मात्र, त्याबदल्यात त्यांना किमान स्वच्छतेच्या सुविधा मिळणे अपेक्षित आहे. प्रवाशांच्या या रास्त अपेक्षा पूर्ण करणे आपले कर्तव्य आहे. बस स्थानकांवरील प्रसाधनगृहे अस्वच्छ असतील, तर त्याचा थेट परिणाम एसटीच्या प्रतिमेवर होतो. त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही कुचराई होता कामा नये,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले. बस स्थानकांवरील प्रसाधनगृहांची नियमित तपासणी करावी, स्वच्छतेबाबत सातत्याने जागरूक राहावे आणि संबंधित कंत्राटदार संस्थांकडून करारानुसार योग्य प्रकारे स्वच्छता करून घ्यावी, असे निर्देशही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

https://www.prahaar.in/2026/10/23/nashik-trimbakeshwar-kumbh-mela-how-far-along-are-the-preparations-in-the-city-for-the-flag-hoisting-ceremony/

केवळ कंत्राटदारांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रातील स्वच्छतेवर संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. “प्रवाशांना स्वच्छ सुविधा देण्यात आपण कमी पडलो, तर त्याची जबाबदारी संबंधित विभाग नियंत्रकांवर निश्चित केली जाईल,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. एसटी ही सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासासोबतच स्वच्छ बस स्थानक व आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासनाने अधिक संवेदनशीलता दाखवून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बैठकीत मांडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here