मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबईतील वाढते वायू प्रदुषण आणि धुळीचे प्रदुषण रोखण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पर्यावरण विभागाचा माध्यमातून केला जात असून आतापर्यंत २९७ दिवसांपैंकी २३१ दिवस मुंबईचीही हवा समाधानकारक असल्याची दिसून आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये प्रदुषणाचे प्रमाण नियंत्रणात आणून २३२ दिवसांपेक्षा अधिक दिवस मुंबईची हवा अधिक चांगल्याप्रकारे समाधानकारक आणि शुध्द कशाप्रकारे राहिल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने असा विश्वासच व्यक्त केला आहे.
मुंबईतील वाढत्या प्रदुषणाबाबत चुकीची माहिती आणि आकडेवारी मांडली जात असल्याने पर्यावरण विभागाच्यावतीने केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांनी माध्यमांना दिली. यावेळी केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत सादरीकरणही करण्यात आले. यावेळी बोलतांना ढाकणे यांनी जानेवारपासून आतापर्यंत मुंबईतील समाधानकार हवा असलेल्या दिवसांची संख्या २३१ एवढी आहे आणि पुढेही समाधानकारक हवा असलेल्या दिवसांची संख्या कशी वाढली जाईल यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.

https://www.prahaar.in/2026/10/22/a-priceless-gift-of-maharashtrian-culture-for-droupadi-murmu-what-is-the-specialty-of-a-paithani/
वायू प्रदुषण, बांधकामांमुळे धुळीचे प्रदुषण आणि मरिन प्रदुषण आदींचा प्रदुषणामध्ये समावेश असून सध्या वापरात असलेल्या धुळ झाडणाऱ्या यांत्रिक झाडू ऐवजी धुळ शोषून घेणाऱ्या आणि फवारणी करणाऱ्या यंत्राचा वापर केला जाणार आहे. आतापर्यंत अशाप्रकारची २९ यंत्रे खरेदी केली जात असून त्यातील २६ यंत्रे ताफ्यात जमा झाली आहे, तर ३ यंत्रे लवकरच येणार आहेत.
याशिवाय हवेची गुणवत्ता निर्देशांक अचूक जाणून घेण्यासाठी समीर ऍपचा वापर केला जावा असे आवाहन ढाकणे यांनी केला आहे. लाकडांचा वापर करणाऱ्या बेकरी या पीएनजी गॅस किंवा विद्युतवर आधारीत बनवल्या जात असून आतापर्यंत ८७ टक्के बेकरी या पीएनजीवर आधारीत बनले आहेत. त्यामुळे उर्वरीत बेकऱ्या आता बंद करण्याचा प्रयत्न केला जाईल असेही ढाकणे यांनी सांगितले.
यंदाच्या दिवाळीत फटाके फोडू नका
मुंबईत ऑक्टोबर महिन्यासह नोंव्हेबर, डिसेंबर, जानेवारी आणि मार्च महिन्यांपर्यंत हवेचा निर्देशांक वाढला जाण्याची शक्यता असते आणि या कालावधीमध्ये प्रदुषणाची पातळी वाढणार नाही याची प्रत्येक नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये ध्वनी आणि पर्यायाने वायूचे प्रदुषण करणारे फटाके न फोडण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने ढाकणे यांनी केले आहे. नागरिकांनी स्वत:हून पुढाकार घेवून फटाके न फोडता मुंबईची हवा अधिकाधिक समाधानकारक ठेवण्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले.
मागील काही वर्षांतील समाधानक हवा असलेले दिवस
जानेवारी ते डिसेंबर २०२३: १८५ दिवस
जानेवारी ते डिसेंबर २०२४: २१६ दिवस
जानेवारी ते डिसेंबर २०२५: २२२ दिवस
जानेवारी ते २२ ऑक्टोबर २०२६: २३१ दिवस