Home ब्रेकिंग न्यूज सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश

सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश

0
सात महिन्यांपासून सासवड नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना वेतनच नाही, कामगार मंत्र्यांनी दोषींवर कारवाईचे दिले निर्देश
फोटो सौजन्य: मंत्री आकाश फुंडकर (X Account)

मुंबई: सासवड नगरपालिकेतील 230 कंत्राटी कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), कर्मचारी राज्य विमा (ईएसआय) आणि अन्य वैधानिक लाभ मिळत आहेत किंवा नाहीत, याची विशेष चौकशी करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले आहेत. सोबतच त्यांचे सात महिन्यांचे थकीत वेतन तातडीने देण्याची सोय सुद्धा करण्यात यावी निर्देश कामगार मंत्र्यांनी आज दिले आहे.

https://www.prahaar.in/2026/10/22/duration-of-the-ban-on-the-entry-of-vehicles-to-saptashrungi-gad-on-the-occasion-of-kojagiri-purnima-has-been-changed/

आज कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या आयोजित बैठकीमध्ये कामगार मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सासवड नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे वेतन करण्याबद्दलचे निर्देश दिले आहेत. शिवाय, सर्व कंत्राटी कर्माचाऱ्यांना सॅलरी देऊन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देशही कामगार मंत्र्यांनी झालेल्या बैठकीमध्ये दिली आहे. कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या नियोजित बैठकीत आमदार विजय शिवतारे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय ए कुंदन, उपसचिव दीपक पोकळे, उपसचिव स्वप्नील कापडणीस उपस्थित होते.

 

दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ” सासवड नगरपालिकेत एकूण 230 कंत्राटी कामगार गेल्या 28 वर्षांपासून सेवा बजावत आहेत. त्यांच्या कामाचे स्वरूप नियमित असूनही या कामगारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतलेले नाही. नगरपालिकेने मंजूर केलेल्या वेतनातून वेगवेगळ्या कारणांनी तब्बल 30 ते 40 टक्के सॅलरीतली रक्कम कपात केली जात असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे. याच आधारावर दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.”

https://www.prahaar.in/2026/10/22/major-preparations-underway-in-trimbakeshwar-ahead-of-the-simhastha-kumbh-mela-national-monument-authority-grants-approval-for-road-repairs-in-the-vicinity-of-the-jyotirlinga-temple/

2022 पासून अनेक कामगारांचा पीएफ नियमितपणे जमा झालेला नाही. शिवाय, ईएसआय, किमान वेतन, साप्ताहिक सुटी, वैधानिक लाभ मिळत नसल्याच्या ही तक्रारी आलेले आहेत. नगरपालिका ही मूळ नियोक्ता संस्था असल्यामुळे संबंधित ठेकेदारांकडून कामगार कायद्यांचे पालन होत आहे किंवा नाही, याची तपासणी करणे ही नगरपालिकेची कायदेशीर जबाबदारी आहे. त्यामुळे सासवड नगरपालिकेकडून या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल तातडीने मागवावा, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here