Home क्रीडा संजू सॅमसन की नमन धीर! विजयाचा शिल्पकार कोण? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…

संजू सॅमसन की नमन धीर! विजयाचा शिल्पकार कोण? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…

0
संजू सॅमसन की नमन धीर! विजयाचा शिल्पकार कोण? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला…
संजू सॅमसन की नमन धीर! विजयाचा शिल्पकार कोण? कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला... (Photo: BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला गडी राखून पराभूत केलं. तसेच मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर यालाही प्रथम गोलंदाजी करायची होती, पण वाटेला फलंदाजी आली. क्राइस्टचर्च मैदानातील खेळपट्टीवर धावांचा पाठलाग सहज होईल असं दिसत होतं. त्यामुळे न्यूझीलंडने आक्रमक फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. न्यूझीलंडने 20 षटकात 4 गडी गमवून 225 धावा केल्या आणि विजयासाठी 226 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान भारताने 6 गडी गमवून 19.4 षटकात पूर्ण केलं. या विजयात संजू सॅमसन, श्रेयस अय्यर आणि नमन धीर यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. पण विजयाचा शिल्पकार ठरला तो संजू सॅमसन.. त्याने 33 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकार मारत 67 धावांची खेळी केली. पण नमन धीरने 15 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी विसरून चालणार नाही. कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला? जाणून घेऊयात..

श्रेयस अय्यर म्हणाला की…

श्रेयस अय्यर याने खेळपट्टीचं विश्लेषण करताना सांगितलं की, ‘आम्ही गोलंदाजी सुरू केली, तेव्हा मला वाटलं की पिच थोडं संथ खेळत होतं. चेंडू थोडा रेंगाळत येत होता आणि आम्ही ज्या ‘हार्ड लेन्थ’वर गोलंदाजी करायला हवी होती, त्याऐवजी थोडं पुढे चेंडू टाकले. पण जसा सामना पुढे सरकला, तसं दव पडायला लागलं आणि विकेट थोडी सपाट होऊन चेंडू वेगाने घसरत बॅटवर खूप चांगल्या प्रकारे यायला लागला. याचमुळे त्यांना ती गती मिळाली आणि त्यांनी 220 धावांचा टप्पा गाठला. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करायलाच हवं. पण जेव्हा तुम्ही 220 धावांचा पाठलाग करत असता, तेव्हा तुम्हाला अशाच सुरुवातीची गरज असते. पहिल्या सहा षटकांत 80-85 धावांपर्यंत पोहोचणं, ही खरोखरच एक जबरदस्त सुरुवात आहे.’

https://www.prahaar.in/2026/10/22/south-africa-makes-a-comeback-defeating-australia-by-an-innings-and-31-runs-here-how-the-wtc-standings-have-changed/

अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची स्तुती

कर्णधार श्रेयस अय्यर याने अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची स्तुती करताना सांगितलं की. ‘ते दोघेही अत्यंत अनुभवी आहेत. त्यांनी त्यांचं काम कसं करावं हे त्यांना सांगण्याची अजिबात गरज नाही. ते काय करत आहेत हे त्यांना नीट ठाऊक आहे. एकदा का ते लयीत आले की, फक्त ती गती पुढे चालू ठेवण्याचं काम असतं आणि आजचं प्रदर्शन हे त्याचंच एक उदाहरण होतं. अर्थात, असं प्रत्येक वेळी घडत नाही, पण जेव्हा त्यांची जोडी जमते, तेव्हा ते आमच्यासाठी सामना एका बाजूला करून ठेवतात. त्यानंतर आम्ही उर्वरित फलंदाज फक्त येतो, डाव सांभाळतो आणि सामना जिंकवून देतो.’

नमन धीरच्या कामगिरीवर खूश

श्रेयस अय्यर याने नमन धीरच्या कामगिरीचं कौतुक केलं आणि म्हणाला की, ‘तो आपल्याला अनेक पर्याय देतो, विशेषतः डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी, किंवा अगदी उजव्या हाताचे फलंदाज खेळत असतानाही. या मैदानावर येऊन ती दोन-तीन महत्त्वाची षटके टाकणं सामन्याचा नूर बदलू शकतं. मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, आज त्याने दाखवलेला शांत आणि संयमी स्वभाव आणि त्याची फलंदाजी पाहणं खरोखरच अप्रतिम होतं.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here