महाराष्ट्रातील नागरी पायाभूत सुविधा आणि जलप्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम व दीर्घकालीन शाश्वत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. प्रकल्पांसाठी जमीन व आवश्यक परवानग्यांची पूर्वतयारी, वीज खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा आणि बॅटरी साठवणूक तंत्रज्ञानाचा वापर, तसेच प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी औद्योगिक ग्राहक निश्चित करण्यावर त्यांनी भर दिला. जागतिक बँक आणि आयएफसीच्या सहकार्याने प्रकल्पांची अंमलबजावणी वेगाने करण्याचेही निर्देश देण्यात आले.





