Home महाराष्ट्र अहिल्यानगर Ravan Dahan 2026 : आतषबाजीने आसमंत उजळला; ढोल-ताशांचा निनाद, घोड्यांचा ठेका अन्‌ नेत्रदीपक आतषबाजी

Ravan Dahan 2026 : आतषबाजीने आसमंत उजळला; ढोल-ताशांचा निनाद, घोड्यांचा ठेका अन्‌ नेत्रदीपक आतषबाजी

0
Ravan Dahan 2026 : आतषबाजीने आसमंत उजळला; ढोल-ताशांचा निनाद, घोड्यांचा ठेका अन्‌ नेत्रदीपक आतषबाजी
दसरा रावण दहन (फोटो सौजन्य: ANI)

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : विजयादशमी निमित्त एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने 25 फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. रावण दहनाचा थरार अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी देवस्थानच्या मैदानात मोठी गर्दी केली होती. रावण दहनानंतर करण्यात आलेल्या नेत्रदीपक आतषबाजीने संपूर्ण परिसर उजळून निघाला. ‘बोलो सियारामचंद्र की जय’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि उत्साहपूर्ण वातावरणात विजयादशमीचा सोहळा साजरा करण्यात आला.

विजयादशमीनिमित्त देवस्थान परिसरात धार्मिक आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंदिरात श्री रेणुकामातेची विधिवत आरती करण्यात आली. त्यानंतर वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. हलगी आणि संबळच्या निनादाने परिसरात उत्साह संचारला होता. पारंपरिक वाद्यांच्या तालावर देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि भाविकांनी ठेका धरत मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

https://www.prahaar.in/2026/10/21/eknath-shinde-police-commemoration-day-tribute-martyrs/

या मिरवणुकीतील तालावर नृत्य करणाऱ्या घोड्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच पांडा आणि चिपांझीच्या कार्टून पात्रांनी बालगोपालांचे मनोरंजन केले. लहान मुलांसह नागरिकांनीही या मिरवणुकीचा आनंद घेतला. मंदिर परिसरातून सुरू झालेल्या या मिरवणुकीमुळे विजयादशमीच्या उत्सवाला अधिकच रंगत आली. मिरवणुकीनंतर मंदिरासमोरील मैदानात उभारण्यात आलेल्या 25 फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक हेमंत थोरात यांच्या हस्ते दहन करण्यात आले. यावेळी श्री रेणुकामाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर भोर, उपाध्यक्ष साहेबराव भोर, सचिव दत्तात्रय विटेकर, खजिनदार एकनाथ वाघ, विश्‍वस्त राजू भोर, विष्णू भोर, किरण सप्रे, गणेश कातोरे, महेश सप्रे, सचिन कोतकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो भाविक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here